‘’भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींकडेही केली होती तक्रार, परंतु…’’ असंही अंगकिता यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : युवक काँग्रेस आसामच्या अध्यक्षा अंगकिता दत्ता यांनी राहुल गांधींच्या जवळचे असलेले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार निदर्शनास आणल्यानंतरही राहुल गांधी यांनी कोणतीही कारवाई करण्यात रस दाखवला नाही. Dr Angkita Dutta President of IYC Assam alleges being harassed by Srinivas BV IYCs National President for her gender
अंकिता दत्ता यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, श्रीनिवास यांनी मला सतत त्रास दिला आणि माझ्या लिंगाच्या आधावर माझ्याशी कायम भेदभाव केला. परंतु माझे मूल्य आणि संस्कार आता मला हे अधिक सहन करू देत नाहीत. हे प्रकरण अनेकदा समोर आणूनही नेतृत्वाने याकडे कानाडोळा केला.
याशिवाय आसाम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अंजन दत्ता यांची मुलगी अंकिता दत्ता यांनी पुढे लिहिले आहे की, ‘’बी.व्ही. श्रीनिवास यांना वाटते की ते खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांना पक्षाच्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे ते संघटनेतील एका महिलेचा छळ करू शकतात आणि त्यांचा अपमान करू शकतात. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टॅग करत आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्षा दत्ता यांनी म्हटले की, त्यांना राहुल गांधींवर खूप विश्वास होता आणि भारत जोडो यात्रेदरम्यान जम्मूमध्ये श्रीनिवास यांच्याकडून झालेल्या छळवणुकीबद्दल आणि अनादरपूर्ण वागणुकीबद्दल सांगितले, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही.’’
Dr Angkita Dutta, President of IYC Assam, alleges being harassed by Srinivas BV, IYC’s National President for her gender. She says that even after approaching Rahul and Priyanka Gandhi, no inquiry committee has been constituted. Harassment of women is endemic in Congress ranks… pic.twitter.com/0MkG281DJm — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) April 18, 2023
Dr Angkita Dutta, President of IYC Assam, alleges being harassed by Srinivas BV, IYC’s National President for her gender. She says that even after approaching Rahul and Priyanka Gandhi, no inquiry committee has been constituted. Harassment of women is endemic in Congress ranks… pic.twitter.com/0MkG281DJm
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) April 18, 2023
अंगकिता दत्ता यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, त्यांच्या तक्रारीनंतरही युवक काँग्रेसच्या श्रीनिवास यांच्याविरोधात चौकशी समिती गठित झाली नाही. एवढंच नाही तर महिलासाठी ही सुरक्षित जागा आहे का? असा प्रश्नही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना टॅग करत दत्ता यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App