लहान मुलांसारखे वागू नका, स्वत;मध्ये बदल घडवा अन्यथा बदलले जाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खासदारांना इशारा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लहान मुलांसारखे वागू नका, जनतेसाठी स्वत:मध्ये बदल घडवा अन्यथा बदलले जाल. सभागृहात उपस्थित राहून जनतेच्या हितासाठी काम करा, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना दिला आहे.Don’t act like children, change yourself otherwise you will change, Prime Minister Narendra Modi’s warning to MPs

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची बैठक दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये झाली. यावेळी मोदींनी सतत गैरहजर राहणाऱ्या खासदारांचे कान टोचताना लहान मुलांसारखे वागू नका असल सल्ला दिला. ते म्हणाले, मी तुम्हाला लहान मुलांसारखी वागणूक द्यावी हे बरोबर नाही. लहान मुलांना सुद्धा एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगितलेली आवडत नाही.



पंतप्रधानांनी खासदारांना रोज सूर्य नमस्कार करण्याचा सल्ला दिला आहे. सूर्य नमस्कार करा आणि संसदेत लवकर हजर होण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हा. यामुळे तुमचे आरोग्य देखील सुरळीत राहील. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदारांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी खासदारांना आवाहन केले आहे. मात्र, संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. याठिकाणी खासदारांनी गैरहजर राहू नये. जनतेच्या हितासाठी काम करावे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे.

Don’t act like children, change yourself otherwise you will change, Prime Minister Narendra Modi’s warning to MPs

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात