वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वारंवार केंद्रातील मोदी सरकारवर ते भांडवलदार धार्जिणे असल्याची टीका केली आहे. त्यांना प्रसिद्धी देखील मिळाली आहे. Dogs, cows, pigs came in Bharat Jodo Yatra…” Rahul Gandhi at Red Fort पण आज राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राहुल गांधींनी एक अजब वक्तव्य केले. भारत जोडो यात्रेत गाई, म्हशी, डुकरं, कुत्री सगळे आले. आम्ही त्यांना सामावून घेतले. कोणाविरुद्धही नफरत हिंसा फैलावली नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी आत्तापर्यंत भारत जोडो यात्रेचा उद्देश अनेक भाषणांमधून स्पष्ट केला आहे. देशभरात सध्या हिंसा आणि नफरतीचा माहोल असल्यामुळे आपण कन्याकुमारी ते काश्मीर असा भारत जोडायला निघालो आहोत. नफरतीच्या माहोल मध्ये मोहब्बतचे दुकान खोलत आहोत, असे ते वारंवार म्हणाले आहेत. पण या यात्रेचे समर्थन करताना त्यांनी गाई, म्हशी, कुत्री, डुकरं यांचा वेगळाच संदर्भ देऊन आज भारत जोडोच्या व्याख्येला आणि संकल्पनेला वेगळेच वळण दिले.
भारत जोडो यात्रेत लाखो लोक सामील झाले यात्रेत गाई, म्हशी, कुत्री, डुकरं असे प्राणी देखील आले. पण कोणीही त्यांना यात्रेतून हाकलले नाही. मारले नाही. त्यांनाही आम्ही सामावून घेतले. आम्ही कोणतीही हिंसा आणि नफरत फैलावली नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्याची अजब वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेस एवढा जुना राजकीय पक्ष भारत जोडायला निघाला म्हणजे माणसे जोडणार की प्राणी?, असे सवाल अनेकांनी केले आहेत.
कमल हसन सहभागी
भारत जोडो यात्रेत राजधानी दिल्लीत आज काही काळ दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन सहभागी झाले. यापूर्वी अनेक सेलिब्रिटी, बॉलीवूडचे स्टार्स विविध शहरांमध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. यामध्ये मेधा पाटकर यांच्यापासून रघुराम राजन यांच्यापर्यंत, तर स्वरा भास्कर हिच्यापासून ते कमल हसन यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी यात्रेत गाई, म्हशी, कुत्री डुक्करं आल्याचा उल्लेख करणे अनेकांना अजब वाटले आहे आणि त्याचेच पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App