साेसायटीत फिरणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लयाने साेसायटीच्या इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा चावा घेतला. याचा राग येऊन मुलीच्या आईने काठीने दाेन कुत्र्यांचे पिल्लास मारुन त्यांचा मृत्यु घडवला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -साेसायटीत फिरणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लयाने साेसायटीच्या इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा चावा घेतला. याचा राग येऊन मुलीच्या आईने काठीने दाेन कुत्र्यांचे पिल्लास मारुन त्यांचा मृत्यु घडवला आहे. पाेलीसांनी कुत्र्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर संबंधित महिले विराेधात हडपसर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Dog bite the girl in fursungi area society, girl mother murder the two dogs
अनिता दिलीप खाटपे (वय-४५,रा.फुरसुंगी,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पाेलीसांकडे नीता आनंद बिडलान (४३) यांनी तक्रार दाखल केली आहे. आराेपी महिला ही फुरसुंगी रस्त्यावरील ग्रीन हाईव्ह साेसायटीत रहाण्यास आहे. तिच्या मुलीला साेसायटीतील कुत्र्याचे पिल्लयाने चावा घेतला हाेता. या गाेष्टीचा राग येऊन अनिता खाटपे यांनी दाेन कुत्र्याचे पिल्लांचा मृत्यु घडून येईल याची जाणीव असतानाही त्यांना काठीने मारुन त्यांचा मृत्यु घडवून आणला आहे.
तसेच त्याबाबत साेसायटीतील रहिवासी तिला समजावून सांगण्यासाठी गेले असता, त्यांचे अंगावर धावुन जाऊन त्यांना शिवीगाळ करुन ‘मी सर्व कुत्र्यांना मारुन टाकणार आहे, तुमच्या कुत्र्यांना देखील मारुन टाकीन’ अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी हडपसर पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App