अमेरिकेत बिहार-झारखंडच्या डॉक्टरांनी सुरु केली टेलिमेडिसीन हेल्पलाइन सेवा, पाटण्याला औषधपुरवठाही

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या बिहार आणि झारखंडच्या डॉक्टरांच्या गटाने घरबसल्या मोफत वैद्यकीय सल्ला देण्यासाठी टेलिमेडिसीन हेल्पलाइन सुविधा सुरू केली. कोरोना संसर्गामुळे रुग्ण केवळ शारीरिक रूपानेच नाही तर मानसिकदृष्ट्याही आजारी पडत आहेत. त्यामुळेच झारखंड आणि बिहारच्या डॉक्टरांच्या एका भारतीय अमेरिकी गटाने यावर मार्ग शोधला आहे. Doctors from Bihar and Zarkhand start helpline in USA

डॉक्टरांची टीम कोरोनाबाधित रुग्णांना घरबसल्या मोफतपणे टेलिमेडिसीन हेल्पलाइनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देईल. प्रत्यक्षात ही सेवा रुग्णांना इंटरनेटवर ॲपच्या माध्यमातूनच उपलब्ध असणार आहे. कोविडचे लक्षण, उपाय, खबरदारी याबाबतचे रुग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यानुसार सुरवातीच्या काही दिवसात सुमारे डझनभर डॉक्टरांनी अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मोफत सल्ले दिले.



भारतीय अमेरिकी डॉक्टरांच्या मते, कोविडबाबत नागरिकांत जागरुकतेचा अभाव आहे. त्यामुळे या गटाने दोन स्थानिक स्वयंसेवी संस्था आस्था आणि आशा यांना टेलिमेडिसिनशी जोडून घेतले आहे. टेलिमेडिसीनने केवळ उपचारच केले जाणार नाही तर संसर्गाशी निगडित सर्वप्रकारची माहिती पुरवली जाणार आहे. भारतात सध्या कोविडचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. एवढ्या भयंकर संकटाची कल्पनाही कोणी केली नव्हती. रुग्णांना बेड मिळत नसून ऑक्सिजनही मिळत नसल्याचे चित्र आहे. या गटाकडून पाटण्यालाही औषधी पुरवठा करण्याचे काम केले जात आहे.

Doctors from Bihar and Zarkhand start helpline in USA

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात