मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावरची आक्षेपार्ह टिपण्णी ए. राजांना भोवली; निवडणूक आयोगाने प्रचारावर ४८ तास बंदी घातली


तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर टीका करताना त्यांच्या आईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे टू जी घोटाळा फेम माजी दूरसंचार मंत्री आणि द्रमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. त्यांना 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. द्रमुकनेही आपल्या स्टार प्रचारकाच्या यादीतून राजा यांना हटविले आहे.DMK leader A. Raja barred from campaign for 48 hours.


विशेष प्रतिनिधी 

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर टीका करताना त्यांच्या आईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे टू जी घोटाळा फेम माजी दूरसंचार मंत्री आणि द्रमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. त्यांना 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. द्रमुकनेही आपल्या स्टार प्रचारकाच्या यादीतून राजा यांना हटविले आहे.

तमिळनाडू येथील प्रचार 4 एप्रिल रोजी संपत आहे. त्याचवेळी ही कारवाई झाल्याने द्रुमकला मोठा धक्का बसला आहे. राजा यांनी लेखी खुलासा केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.
काहीदिवसांपूर्वी ए. राजा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्याविषयी आक्षपार्ह वक्तव्य केलं होतं



स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे. पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल आहेत, असे म्हटले होते. यामुळे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना भाऊक होऊन व्यासपीठावरच रडू कोसळले होते. आपल्या आईविषयीच ही टिपणी असल्याचे त्यांनी म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजा यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. महिलांचा अपमान करणं ही काँग्रेस, द्रमुकची संस्कृती आहे. त्यांनी जुनं टूजी मिसाईल डागलं असून त्याला फक्त एकच लक्ष्य आहे,

तमिळनाडूच्या महिलांचा अपमान.काँग्रेस आणि द्रमुकने आपल्या नेत्यांना आवर घालावा, जनता प्रत्येक गोष्टीची नोंद करीत आहे, महिलांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाले होते.

ए. राजा हे काँग्रेस आणि द्रमुकचे कालबाह््य टूजी क्षेपणास्त्र असल्याचा आरोप करत तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या मातोश्रींचा अपमान करून तमिळनाडूतील महिलांना लक्ष्य केल्याबद्दल मोदी यांनी राजा यांना चांगलेच फटकारले होते.

ते म्हणाले होते की काही दिवसांपूर्वी द्रमुकचे एक नेते दिंडिगल लिओनी यांनी महिलांबद्दल गंभीर वक्तव्य केलं होतं. द्रमुकने त्यांना थांबवण्यासाठी काहीही केलं नाही. आता युपीएनं त्यांचं जुनं टूजी मिसाईल डागलं आहे.

तामिळनाडूच्या नारीशक्तीवर हल्ला करण्याचं टार्गेट या मिसाईलला दिलं आहे. देव न करो, जर ते सत्ते आले, तर ते तामिळनाडूच्या अनेक महिलांचा अपमान करतील.ए. राजा यांच्याप्रमाणेच दिंडिगल लिओनी यांनी देखील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

परदेशी गायींचं दूध प्यायल्याने आपल्याकडच्या महिला ड्रमसारख्या जाड झाल्या आहेत. आधी त्यांचा आकार 8 आकड्यासारखा होता, असे त्यांनी म्हटले होते.

DMK leader A. Raja barred from campaign for 48 hours.

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात