विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फॅब इंडिया कंपनीच्या ‘जश्न-ए-रिवाज’ या जाहिरात मोहिमेविरोधात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी विरोध केला आहे. ‘दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही. त्याला विरोध केला पाहिजे आणि फॅब इंडियावर बहिष्कार घातला पाहिजे. फॅब इंडियासारख्या कोणत्याही ब्रँडला अशा कृत्यासाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला.Diwali is not a Jashn-e-Rivaj, Fab India withdraws ad after Tejaswi Surya slamed it
फॅब इंडियाने ही जाहिरात मागे घेतली आहे. #BoycottFabIndia सकाळपासून सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. हा वाद फॅब इंडिया या कपडे, घर सजावट आणि जीवनशैली उत्पादनांशी संबंधित कंपनीचा आहे – ‘आम्ही प्रेम आणि प्रकाशाच्या सणाचे स्वागत करतो. फॅब इंडिया जश्न-ए-रिवाज कलेक्शन सादर करत आहे.
पद्मश्री आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष मोहनदास पै यांनीही फॅब इंडियाच्या ‘जश्न-ए-रिवाज’ मोहिमेवर आक्षेप घेतला. त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘फॅब इंडियाचे दिवाळीनिमित्त अत्यंत लज्जास्पद विधान आहे! हा ख्रिसमस आणि ईद सारखाच हिंदूंचा धार्मिक सण आहे! असे विधान धार्मिक सण संपवण्यासाठी मुद्दाम केलेला प्रयत्न दर्शवते.
फॅब इंडियाने एक ट्विट करत म्हटले होते की, “आम्ही प्रेम आणि प्रकाशाचा सणाचे स्वागत करतो, फॅबइंडिया द्वारे जश्न-ए-रिवाज ही अशी एक संकल्पना आहे जी भारतीय संस्कृतिला समर्पित करते.”, याला सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला. त्यानंतर हे ट्विट फॅबइंडियाने डिलीट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App