पाश्चात्य शिक्षणवेत्त्यांचा आणि इस्लामिस्टांचा हिंदुद्वेष हिंदुत्वाच्या नष्टचर्यापर्यंत पोहोचला; हिंदुत्वाला उद्ध्वस्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्वत परिषद!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात हिंदुत्वाचा अभिमान वाढायला लागल्यावर इस्लामिस्ट आणि लिबरल्सचा हिंदुद्वेष वाढू लागला तसे त्याचे पडसाद पाश्चात्य शिक्षणवेत्ते आणि इस्लामिस्ट यांच्यात उमटले आहेत. त्यांचा आधीचाच हिंदुद्वेष आता हिंदुत्वाचा नष्टचर्यापर्यंत पोहोचला आहे. त्याला भारतातल्या लिबरल्सचीही साथ मिळाली आहे. “Dismantling Global Hindutva” international conference on 10 – 12 September 2021

डॉ. एड्री अँड्र्यू ट्रूस्क या कथित विचारवंत महिलेने आयोजित केलेल्या “हिंदुत्वाचे नष्टचर्य” Dismantling Global Hindutva या विषयावरील परिषदेला पाश्चात्य देशांतील 40 विद्यापीठांनी स्पॉन्सर केले आहे. त्यामध्ये भारतातल्या लिबरल्सचा समावेश आहे. “हिंदुत्वाचे वाढत चाललेले आव्हान नष्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे”, असा या मंडळींचा युक्तिवाद आहे. 10 ते 12 सप्टेंबर 2021 अशी तीन दिवस ही परिषद व्हर्च्युअली होणार आहे.

आत्तापर्यंत या मंडळींचा हिंदुद्वेष हिंदू संघटनांवर, हिंदुत्ववाद्यांवर टीका करण्यापर्यंत मर्यादित होता. परंतु आता त्यांना हिंदुत्ववादच नष्ट करायचा आहे. एक प्रकारे जगभरातल्या संपूर्ण हिंदू समाजाला धर्मांध आणि जातीयवादी ठरवून हिंदुत्व या शब्दापासून पूर्णपणे समाजाला फारकत घ्यायला लावायची आहे.हिंदुत्वावरची राजकीय-सामाजिक टीका हिंदुत्ववाद्यांवरचा राग याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण हिंदू समाजालाच टार्गेट करण्याचे हे षडयंत्र आहे. यासाठीच त्यांनी परिषदेच्या विषयाचे नाव हिंदुत्वाचे नष्टचर्य Dismantling Global Hindutva असे ठेवले आहे. परिषदेत आनंद पटवर्धन आयेशा किडवाई, बानू सुब्रमण्यम, ख्रिस्तोफर जेफ्रोलेट, कविता कृष्णन, मीना कंडासानी आदींचा समावेश आहे.

जगापुढे हिंदुत्ववाद असे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी हिंदुत्ववादाचे नष्टचर्य ओढवले पाहिजे, असा या सर्व वक्त्यांचा आणि विचारवंतांचा युक्तिवाद आहे. जगभरातली 40 विद्यापीठे या परिषदेसाठी स्पॉन्सर्स आहेत. याचा अर्थच हिंदुत्व विषयावर त्यांना चर्चा कोणत्या दिशेने न्यायची आहे हे स्पष्ट होते आहे.

या तथाकथित विचारवंतांनी किंवा या विद्यापीठांनी “इस्लामचे नष्टचर्य”, “ख्रिश्चनांचे नष्टचर्य” अशा स्वरूपाच्या परिषदा भरवलेल्या नाहीत किंवा कार्यशाळाही आयोजित केलेल्या नाहीत. तशी हिंमत त्यांनी कधी दाखवलेली दिसली नाही. मात्र भारतात हिंदुत्ववाद्यांचा राजकीय प्रभाव वाढतच या विचारवंतांचा आणि विद्यापीठांचा हिंदुत्वद्वेष आता हिंदूंच्या नष्टचर्यापर्यंत येऊन ठेपला आहे.

जगभरातील हिंदूंसाठी एक प्रकारे ही धोक्याची घंटा आहे. कारण यामध्ये फक्त हिंदुत्ववादाचा वैचारिक, राजकीय – सामाजिक विरोध नाही तर थेट हिंदुत्वावरच नष्टचर्य ओढवण्याएवढा कुठाराघात करण्याचा त्यांचा मनसूबा आणि नियोजन आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लिबरल्सच्या परिषदेचे हिंसक हेतू यात दडलेले आहेत.

“Dismantling Global Hindutva” international conference on 10 – 12 September 2021

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था