आगामी काळात आर्थिक विकासात डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसायाचा सर्वाधिक वाटा – तज्ञांचे मत


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – भारतात पुढील ११ वर्षांत होणाऱ्या ११०० अब्ज डॉलरच्या आर्थिक विकासात डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसायाचा सर्वाधिक वाटा असेल, असा अंदाज अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. Digital technology is better future

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी फोरम आणि क्रॉसटॉवर या संस्थांनी मिळून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, २०१३ मध्ये डिजिटल व्यवसायाचे बाजारमूल्य दीड अब्ज डॉलर इतके होते. गेल्या आठ वर्षांमध्ये त्यात प्रचंड वाढ होऊन हे मूल्य आता तीन हजार अब्ज डॉलर इतके झाले आहे.

भारतातही डिजिटल व्यवसायात मोठी वृद्धी होणार असून पुढील ११ वर्षांत होणाऱ्या एकूण आर्थिक वाढीत सहाय्यभूत ठरणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल. या तंत्रज्ञानाचा अद्याप शोध लागायचा आहे. भारतात वेब ३.० तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार असून त्याद्वारे या देशात डिजिटल व्यवसाय वृद्धीस अनेक संधी उपलब्ध होतील, असे या अहवालात म्हटले आहे.

जगभरात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा वेग प्रचंड असल्याचे अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. इंटरनेटच्या १० कोटी युजर संख्येवरून एक अब्ज युजर संख्येपर्यंत मजल मारण्यासाठी साडे सात वर्षे लागली. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांची एवढी वाढ होण्यास केवळ चारच वर्षे लागणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Digital technology is better future

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था