विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी तो चक्क श्रीनगरहून दिल्लीच्या दिशेने चालत निघाला आहे. फहीम नजीर शाह असे या चाहत्याचे नाव आहे. पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी त्याने तब्बल ८१५ किलोमीटरचा प्रवास पायी करण्याची तयारी केली आहे.Diehard fan of Prime Minister Modi, he walked 815 km to meet him
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पार्ट टाईम इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा फहीम नजीर शाह हा २८ वर्षीय तरुण आहे. २०० किमी चालल्यानंतर रविवारी (२२ ऑगस्ट) तो उधमपूरला पोहोचला. तो मूळचा श्रीनगरमधील शालीमार रहिवासी आहे. फया कठीण प्रवासाच्या शेवटी त्याचं पंतप्रधानांना भेटण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आपल्या या प्रवासात थोडी थोडी विश्रांती घेत तो दिल्लीच्या दिशेने अंतर कापत चालला आहे.
फहीम नजीर शाह म्हणाला, मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे. मी त्यांना (मोदी) भेटण्यासाठी पायी चालत जात आहे. पंतप्रधानांचं माझ्याकडे लक्ष जाईल याची मी आशा करतो. पंतप्रधानांना भेटणं हे माझे सर्वात मोठं आणि प्रिय स्वप्न आहे.
गेल्या अडीच वर्षात फहीमने दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. तो म्हणाला कि, पंतप्रधानांच्या शेवटच्या काश्मीर दौºयादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला त्यांना भेटू दिलं नाही. मात्र, यावेळी मला खात्री आहे की मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी निश्चित मिळेल.
फहीम नजीर शाह याने सांगितले की, मी गेल्या चार वर्षांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींना फॉलो करत आहे. त्यांचं भाषण आणि हावभाव, कृती माझ्या हृदयाला स्पर्श करतात. एकदा मोदी एका रॅलीमध्ये भाषण देत होते. त्यावेळी अजान ऐकून ते अचानक थांबले. समोर बसलेल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यावेळी आमच्या पंतप्रधानांच्या या कृतीने माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि मी तेव्हापासून त्यांचा कट्टर चाहता झालो आहे.
जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर झालेल्या बदलांबद्दल फहीम म्हणाला की, पंतप्रधान मोदी यांचे जम्मू -काश्मीरवर पूर्ण लक्ष आहे. म्हणूनच परिस्थितीत बदल दिसून येत आहे.
जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. विकास कामं चांगल्या गतीने होत आहेत. मी शिक्षित आणि बेरोजगार युवकांच्या समस्यांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करू इच्छितो आणि केंद्रशासित प्रदेशातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करू इच्छितो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App