दीदी, पराभव स्वीकारा, वाराणसीला या, यूपीच्या लोकांचे मन एवढे मोठे आहे, की ते तुम्हाला टुरिस्ट गँग म्हणणार नाहीत; पंतप्रधान मोदींचा टोला


वृत्तसंस्था

सोनापूर – पश्चिम बंगालच्या निवडणूकीत पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी आज वेगळाच रंग भरला. हुगळीच्या सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पराभवाची लक्षणे त्यांनी सांगितली, तर सोनापूरच्या सभेत त्यांना वाराणसीत येण्याचे खोचक निमंत्रण देऊन टाकले. Didi’s party says that she will contest from Varanasi, which makes two things clear — that she has accepted her defeat in Bengal, says PM narendra modi

मोदी म्हणाले, दीदी…, तुमचेच लोक म्हणाताहेत, की तुम्ही पुढची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहात. हरकत नाही… पण दीदी, याचा अर्थ तुम्ही बंगालमध्ये आपला पराभव होणार असल्याचे स्वीकारलेले दिसतेय. आणि आमच्याच सरकारने हल्दिया – वाराणसी जो जलमार्ग विकसित केलाय त्यातून तर प्रेरणा घेऊन तुम्ही वाराणसीत यायचे म्हणता आहात का… दीदी, आपण जरूर वाराणसीत या… माझ्या वारणीसच्या लोकांचे, यूपीच्या लोकांचे मन एवढे मोठे आहे, की ते तुम्हाला टुरिस्ट म्हणणार नाहीत… टुरिस्ट गँग देखील म्हणणार नाहीत. दीदी, तुम्ही जरूर वारणसीत या.शेवटी बंगालमध्ये पराभूत झाल्यावर तुम्हाला बंगालबाहेरची जागा तर शोधावी लागेलच ना… जरूर वाराणसीतून लोकसभेसाठी प्रयत्न करा, असा टोला मोदींनी ममता बॅनर्जी यांना लगावला.

ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पराभूत होतील, असा प्रचार भाजप नेत्यांनी चालविला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना तृणमूळच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ममता बॅनर्जी या वाराणसीतून मोदींच्या विरोधात निवडणूक लढवतील, असे ट्विट केले होते. त्याला मोदींनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनापूरच्या सभेतून खोचक प्रत्युत्तर दिले.

तत्पूर्वी, हुगळी जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की, जर क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू अंपायरला वारंवार जाब विचारत असेल, तर समजून घ्या की, त्याच्या खेळात दोष आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणीही जर निवडणूक आयोगाला, ईव्हीएमला दोष दिला तर समजून घ्या, त्यांचा खेळ संपलाय.

लोक पैशाच्या अमिषाने भाजपच्या सभांमध्ये येत आहेत असा आरोप ममता बॅनर्जींनी केला होता, त्यावर मोदी म्हणाले, की दीदी, बंगाली लोकांच्या स्वाभिमानाला दुखावले आहे. बंगाली लोक कोणाला विकले जाणारे नाहीत. आहो, इंग्रज सरकार त्यांना विकत घेऊ शकले नाही. त्यांचे वाकडे करू शकले नाही… बाकीच्यांचे काय… राजकीय स्वार्थासाठी तृणमूल कॉंग्रेसने सिंगूरकडे दुर्लक्ष केले, परिसरात कोणताही उद्योग नाही आणि शेतकरी नाराज आहेत. भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी लोक भाजपच्या सभांना येताहेत.

Didi’s party says that she will contest from Varanasi, which makes two things clear — that she has accepted her defeat in Bengal, says PM narendra modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था