कर्नाटकात देवेगौडांचे जनता दल करणार मुसलमान मुख्यमंत्री; कुमार स्वामींनी बोलून दाखविला इरादा


वृत्तसंस्था

बेंगलोर : देशभर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या दहशतवादी संघटनेवर बंदी, हिजाब, लव्ह जिहाद या सारख्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू असताना कर्नाटकात माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी एका वक्तव्यातून ट्विस्ट आणला आहे. कर्नाटकात जेडीएस अर्थात धर्मनिरपेक्ष जनता दल पक्ष सत्तेवर आला तर मुसलमान नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा इरादा कुमार स्वामी यांनी बोलून दाखविला आहे. त्याचबरोबर दलित आणि महिला नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला आहे. Deve Gowda’s Janata Dal will be the Muslim Chief Minister in Karnataka

कर्नाटकात पुढच्या वर्षी 2023 मध्ये मे महिन्यापर्यंत विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. कारण विधानसभेची पाच वर्षांची मुदत संपते आहे. या विधानसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालचा धर्मनिरपेक्ष जनता दल पक्ष कर्नाटकात सत्तेवर आला, तर मुसलमान नेत्याला मुख्यमंत्री बनविण्याचे आश्वासन कुमारस्वामी यांनी दिले आहे. कर्नाटकात देवेगौडांचे निकटवर्ती सी. एम. इब्राहिम हे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कुमार स्वामी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना आपले राजकीय भवितव्य उजळल्याचे दिसू लागले आहे. 14 ऑगस्ट 1948 चा जन्म असलेले सी. एम. इब्राहिम सध्या 74 वर्षांचे आहेत. कर्नाटकात आणि केंद्र सरकारमध्ये ते मंत्री होते कुमार स्वामी यांच्या वक्तव्यामुळे वयाच्या 74 व्या वर्षी सी. एम. इब्राहिम यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना नव्याने पालवी फुटली आहे.एकीकडे कर्नाटकात हिजाबचा वाद जोरदार पेटला असताना त्यात लव जिहाद सारख्या मुद्द्याची भर पडली असताना दिवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने थेट मुसलमान नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याची घोषणा केल्याने राज्यात मोठ्या ध्रुवीकरणाला वेग येऊ शकतो.

कर्नाटकातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर सध्या तेथे भाजप 120 आमदारांच्या बहुमतासह सत्तेवर आहे. काँग्रेसकडे 68 आमदार आहेत, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे 32 आमदार आहेत. याचा अर्थ धर्मनिरपेक्ष जनता दल तिथे तिसऱ्या क्रमांकाची ताकद राखून असणारा पक्ष आहे. त्यातही दावणगिरी, हासन या परिसरात धर्मनिरपेक्ष जनता दलाचा जोर आहे. कारण हासन हा लोकसभा मतदारसंघ पारंपरिक दृष्ट्या एच. डी. देवेगौडा यांचा बालेकिल्ला मानला जातो.

परंतु मुसलमान मुख्यमंत्री करण्याची घोषणा करून एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे. मुसलमान व्होट बँक धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे वळवून त्यांनी काँग्रेस सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला हादरा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. अर्थात कुमार स्वामी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस अथवा भाजप या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Deve Gowda’s Janata Dal will be the Muslim Chief Minister in Karnataka

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण