विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या बालगंधर्व मंदिरामध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा आणि इच्छुकांचा मेळावा भरवण्यात आला. ‘भ्रष्टाचार संपवणार, आम आदमीचे सरकार’ ही मेळाव्याची प्रमुख संकल्पना होती. रिक्षाचालकाचा पासून निवृत्त न्यायाधीशांपर्यंत शेकडो सामान्य नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण सभागृह भरून गेले होते. प्रेक्षागृहाबाहेरही लोक उभे होते. आम आदमी पार्टीचा झाडू फिरवू ,भ्रष्टाचार साफ करू’ हा मुद्दा वक्त्यांनी मांडला.Determination of ‘AAP’; Large crowd at the gathering of aspirants
पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. आम आदमी पक्षाचे प्रदेश संयोजक पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, ज्येष्ठ कार्यकर्त्या तारा मैत्रेय, निवृत्त न्यायाधीश मंजुषा नयन, वाहतूक समितीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते डॉ.अभिजीत मोरे तसेच जनसंपर्क अधिकारी प्रभाकर कोंढाळकर, सुदर्शन जगदाळे, कृष्णाजी गायकवाड आदी व्यासपीठावर होते. भ्रष्टाचार मुक्त सुशासन आणि विकासाचे दिल्ली नव्हे पुणे माॅडेल या मुद्याला सामान्य पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटांमध्ये दाद दिली.
नगरसेवक म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला नोकर असतो. हा नोकर जर नोकर काम करत नसेल तर मालकाला पुढे यावे लागेल आणि नोकराच्या खुर्चीत बसावे लागेल. म्हणूनच ‘आपणच होऊ नगरसेवक’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे विजय कुंभार यांनी नमूद केले.
शहरातील सर्व 173 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. इच्छूकांपैकी किरण कांबळे, प्रेरणा बनसोडे , सना शेख, ज्योती ताकवले, कृष्णाजी गायकवाड, निवृत्त जवान संतोष चौधरी, राहुल म्हस्के, अॅड. दत्तात्रय भांगे, सुदर्शन जगदाळे,आदींनी मनोगत व्यक्त केले. पक्षाच्या पुणे शहर रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांच्या विधवांना परमिट हस्तांतरणाचा कार्यक्रम संयोजकांच्या हस्ते पार पडला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App