Delhi Riots JNU : जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदला न्यायालयाचा दणका; दिल्ली दंगल प्रकरणात फेटाळला जामीन अर्ज!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलीप्रकरणी तुरुंगात असलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला न्यायालयाने दणका दिला असून त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.Delhi Riots JNU: JNU student leader Umar Khalid slapped by court

दिल्ली दंगलीचा कट रचणारा मुख्य सूत्रधार म्हणून उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी यूपीपीए अंतर्गत अटक केली होती. उमर खालिदच्या जामीन याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली होती. जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने गुरुवारपर्यंत टाळला होता. त्यानंतर न्यायालयाने गुरूवारी निकाल सुनावला. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश अमिताभ रावत यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला आहे.

उमर खालिदवरचे आरोप 

मिळालेल्या माहितीनुसार, उमर खालिद अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा भाग असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात सांगितले होते. ज्यांच्या माध्यमातून हिंसाचाराचा कट रचला गेला. उमरने लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते. इतकेच नाही तर जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत आले होते, तेव्हा उमर यांनी लोकांना रस्त्यावर येण्यास सांगितले होते. जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळू शकेल. उमर खालिदच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना सर्व आरोप खोटे आणि बनावट असल्याचे सांगण्यात आले. उमरच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, कोणत्याही मुद्द्यावर आवाज उठवणे हा गुन्हा नाही. उमर खालिद हा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होता. मात्र तो त्या गटांमध्ये सक्रिय नव्हता.

– 53 लोकांचा मृत्यू, 700 जखमी

उमर खालिदसह अन्य लोकांविरोधात फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीत दंगल घडवल्याचा आरोप होता. या झालेल्या हिंसाचारात ५३ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. उमर आणि इतरांनी या दंगलीचा कट आखल्याचा ठपका त्यांच्याविरोधात ठेवण्यात आल्याने दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकतेच नाही तर या दंगलीच्या माध्यमातून देशात अराजकता फैलावण्याचा आरोप देखील उमरवर करण्यात आला आहे.

Delhi Riots JNU: JNU student leader Umar Khalid slapped by court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात