पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या अन्य प्रभावी नेत्यांची सोशल मिडियात बदनामी करण्याचे नियोजनबद्ध प्रकार होत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ टीका करण्याचे प्रकार सातत्याने घडले. यातले बहुतांश प्रकार पश्चिम महाराष्ट्रात उघड होत आहेत. अशाच बदनामी प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. Defamation by morphing photos of Prime Minister Modi, Chief Minister Yogi, NCP activist’s in custody
प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरीत्या मॉर्फ करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी पुण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव मोहसीन ए. शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
भाजपा सोशल मीडियाचे पुणे शहर संयोजक विनीत वाजपेयी (वय ३८, रा. साठेवस्ती, लोहगाव) यांनी सायबर पोलिसांकडे यासंबंधी तक्रार दिली आहे. मोहसीन शेख, शिवाजीराव जावीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली. पंतप्रधानांचे फोटो मॉर्फ करुन ते विकृत स्वरुपात सादर करण्यात आले.
त्यामुळे देशाच्या पंतप्रधानपद या घटनात्मक पदाची व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य जाणूनबुजून केल्याचा आरोप शेख यांच्यावर लावण्यात आला आहे. सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App