या सामन्यात तिने शूट-ऑफमध्ये रशियन ऑलिम्पिक समितीच्या केसेनिया पेरोवाला पराभूत केले.
विशेष प्रतिनिधी
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी जागतिक क्रमवारीत नंबर वन महिला तिरंदाज दीपिका कुमारीने शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात तिने शूट-ऑफमध्ये रशियन ऑलिम्पिक समितीच्या केसेनिया पेरोवाला पराभूत केले. दीपिकाने हा सामना 6-5 असा जिंकला. Deepika’s 6-5 victory in archery, reached the quarter finals
याशिवाय बॅडमिंटन महिला उपांत्यपूर्व फेरीतील पीव्ही सिंधू, बॉक्सिंगमधील लोव्हलिना बोरगोहेन आपली शक्ती दाखवतील. ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे आणि दुती चंद भारतासाठी त्यांचे आव्हान सादर करतील. हॉकीमध्ये महिला संघाचा सामना आयर्लंडशी तर पुरुष हॉकी संघाचा सामना जपानशी होईल.
टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी एक उत्तम दिवस होता. मेरी कोमचा सामना सोडला गेला तर इतर सर्व भारतीय ॲथलिट्सनी चांगली कामगिरी बजावली.
30 जुलै म्हणजेच आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताचे काही खेळाडू पदकापासून एख पाऊल दूर असतील. पीव्ही सिंधू आणि दीपिका कुमारी सारख्या स्टार खेळाडूंवर देशवासियांच्या नजरा असतील. भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे.मात्र, महिला संघ पुढील फेरी गाठण्याची अजिबात शक्यता नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App