विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सध्या हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. प्रामुख्याने शाळा आणि कॉलेजमध्ये कशा प्रकारचा पोषाख असावा असा वाद आहे. मात्र, प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की मुलींनी बिकिनी घाला किंवा हिजाब. शाळांमध्ये बिकिनी घालून येण्यास आपण मान्यता देता का असा सवाल यावर करण्यात येत आहे.Debate of school-college attire and Priyanka Gandhi says girls should wear bikini or hijab
उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या हॅशटॅगसह महिलांना त्यांचा पोशाख ठरवण्याचा अधिकार घटनेत मिळाला आहे, असे लिहिले आहे. प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संविधानाने महिलांना त्यांचा पेहराव ठरवण्याचा अधिकार दिला आहे. ती तिला पाहिजे ते घालू शकते… मग ती बिकिनी असो वा बुरखा, जीन्स असो किंवा हिजाब.. महिलांचा छळ करणे थांबवा.
एआयएमआयचे असदुद्दीन ओवेसी या प्रकरणावर म्हणाले, कर्नाटकमध्ये हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी लढणाºया बहिणी यशस्वी व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो. कर्नाटकात राज्यघटनेची खिल्ली उडवली जात आहे. भाजप सरकारच्या या निर्णयाचा मी निषेध करतो.
या वादात कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी म्हटले आहे की, आम्ही कॉलेजमध्ये ‘अल्लाह-हू-अकबर’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणांचा प्रचार करू शकत नाही. कॉलेज कॅम्पसमध्ये धार्मिक घोषणांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.
तर कर्नाटकचे ऊजार्मंत्री सुनील कुमार म्हणाले, काँग्रेस सत्तेत आल्यास असा कायदा करू शकते, ज्यामध्ये हिंदूंना हिजाब घालण्यास सांगितले जाईल. काल काँग्रेसचे डीके शिवकुमार यांनीही शाळेतून झेंडा हटवल्याचा खोटा आरोप केला होता. अशा मानसिकतेतून सिद्धरामय्या आणि काँग्रेसने बाहेर पडायला हवे.
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरही कमल हसन यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केले – कर्नाटकात जे काही चालले आहे त्यामुळे अशांतता निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विषाची भिंत उभी केली जात आहे. शेजारच्या राज्यात जे चालले आहे ते तामिळनाडूत येऊ नये. पुरोगामी शक्तींनी अधिक सावध राहण्याची वेळ आली आहे.
कर्नाटकातील उडुपीमध्ये 1 जानेवारीपासून हिजाबचा वाद सुरू झाला होता, त्यानंतर शिमोगासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू झाली होती. हा वाद सुरू असलेल्या सर्व शाळा आठवडाभर बंद ठेवाव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
कर्नाटकातील कुंदापुरा महाविद्यालयातील 28 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले. या प्रकरणाबाबत मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती की, इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य आहे, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी. या मुलींनी कॉलेजच्या गेटसमोर बसून धरणेही सुरू केले होते. वर्गात हिजाब घालू न दिल्याच्या निषेधार्थ मुलींनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने केली. वर्गात हिजाब घालू न दिल्याच्या निषेधार्थ मुलींनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने केली.
हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रतिसाद म्हणून काही हिंदू संघटनांनी कॉलेज कॅम्पसमध्ये मुलांना भगवी शाल घालण्यास सांगितले. त्याचवेळी हुबळीमध्ये श्री राम सेनेने म्हटले होते की, जे बुरखा किंवा हिजाब घालण्याची मागणी करत आहेत ते पाकिस्तानात जाऊ शकतात. हिजाब घालून भारताला पाकिस्तान की अफगाणिस्तान बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App