विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची अंमलबजावणी संचालनालय, ‘ईडी’ चौकशी करणार आहे. पीएमएलए (Prevention Money Laundring Act ) न्यायालयाने इक्बाल याला न्यायालयात आज हजर राहण्याचे आदेश दिले. इक्बाल कासकर सध्या खंडणीच्या विविध गुन्ह्यात ठाणे कारागृहात कैद होता. Dawood’s brother Iqbal in the custody of ‘ED’
न्यायालयाने बुधवारी इक्बाल विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले होते. आज ‘ईडी’ने ठाणे कारागृहातून इक्बाल कासकरचा ताबा घेतला. त्याला आता मुंबई गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
छापेमारी : मुंबईतील डी कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे, ईडीच्या अधिकाऱ्यांची दाऊदची बहीण हसिना पारकरच्या घरावर धाड, एक जण ताब्यात
दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले. 2 बिल्डरांना समन्स बजावले आहे.
नुकतेच ‘ईडी’ने 10 ठिकाणी छापे घातले होते. यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा सुत्रधार दाऊद इब्राहिम, त्याची बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि गँगस्टर छोटा शकील यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. छोटा शकील त्याच्याशी संबंधित सलीम याची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र त्याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App