विशेष प्रतिनिधी
मुंबई / तिरुअनंतपुरम : महाराष्ट्रात एकीकडे उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री हा विषय काढल्यानंतर राष्ट्रवादीतच मतभेद उफाळण्याची चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा महाराष्ट्रात सुरू असतानाच तिकडे केरळमध्ये काँग्रेसचे खासदार आणि अध्यक्षपदाची निवडणूक लढविलेले नेते शशी थरूर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार पी. सी. चाको यांनी पत्रकार परिषदेत शशी थरूर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे अर्थात ही ऑफर शशी थरूर यांनी नाकारली आहे. Cracks may appear in NCP in maharashtra, but kerala NCP offers shashi tharoor to join NCP
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याचा विषय उद्धव ठाकरे यांनी काढल्यानंतर पहिली महिला मुख्यमंत्री कोण?, या विषयी चर्चा रंगत आहे. रश्मी ठाकरे ते सुप्रिया सुळे अशा नेत्यांची रांग माध्यमांनी मुख्यमंत्रीपदासाठी लावली आहे. त्यातच सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ घातल्या तर राष्ट्रवादीत अजितदादा पवारांचा गट बाजूला होईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. पण महाराष्ट्रात ही अटकळ बांधली जात असतानाच तिकडे केरळमध्ये मात्र राष्ट्रवादीने इन्कमिंगच्या आशेने थेट शशी जरूर यांनाच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.
चाकोंची ऑफर थरूरांनी नाकारली
शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी मलबारचा दौरा केला होता. त्यावरून प्रदेश काँग्रेसचे काही नेते थरूर यांच्यावर नाराज झाल्याची तिथल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मुद्द्यावर भर देत शशी थरूर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पी. सी. चाको यांनी दिली आहे. शशी थरूर हे तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी ते तिरुअनंतपुरमचे पुढचे खासदार असतीलच, असा विश्वास देत चाको यांनी थरूर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. पण ही ऑफर मात्र शशी थरूर यांनी नाकारली आहे. ऑफर त्याला दिली जाते, जो तुमच्याकडे येऊ इच्छितो. मला काँग्रेसमध्ये राहायचे आहे. त्या पक्षात कोणतीही गटबाजी करायची नाही आणि काँग्रेस तर अजिबात सोडायची नाही, असे वक्तव्य शशी थरूर यांनी करून राष्ट्रवादीतल्या ऑफरच्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App