उत्तर प्रदेशात बाहुबली नेता मुख्तार अन्सारीची २४ कोटींची स्थायी मालमत्ता जप्त; योगी प्रशासनाची कठोर कारवाई

वृत्तसंस्था

मऊ – उत्तर प्रदेशातला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याची मऊमधील २४ कोटी रूपयांची स्थायी संपत्ती म्हणजे जमीन जिल्हा प्रशासनाने जप्त करून ताब्यात घेतली आहे. मुख्तारची बेकायदा हॉटेल्स आणि महाल योगी सरकारने बुलडोझर चालवून आधीच उध्दवस्त केले आहेत. crackdown on bahubali mukhtar ansari in UP

आता न्यायालयाच्या ७ जून २०२१ च्या आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करीत मऊ जिल्ह्यात मुख्तारने खरेदी केलेली २४ कोटी रूपयांची जमीन मालमत्ता पोलीसांच्या हजेरीत जिल्हा प्रशासनाने जप्त केली आहे. मुख्तारच्या जमिमीवर प्रशासनाने जमीन ताब्यात घेतल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. ही जमीन मुख्तारने आपल्या दोन मुलांच्या नावे घेतली होती.

मुख्तारच्या आर्थिक साम्राज्यावरचा हा पहिला आघात असल्याचे मानण्यात येत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मुख्तारच्या विविध ठिकाणच्या ४७ कोटी रूपयांच्या मालमत्ता आत्तापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्तार अन्सारीला पंजाबच्या रोपड जेलमधून उत्तर प्रदेशातल्या जेलमध्ये आणल्यानंतर संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईस वेग आणण्यात आला आहे.

crackdown on bahubali mukhtar ansari in UP