विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुरक्षेचे कडे तोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार एलामारन करीम यांनी आपला गळा आवळला. यामुळे आपला जीव गुदमरला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता असा आरोप राज्यसभेतील मार्शल राकेश नेगी यांनी केला आहे.Cpm MP strangled , Rajya Sabha marshals allege, Anil Desai also tried
नेगी म्हणाले, ११ आॅगस्टला राज्यसभा चेंबरमध्ये आपल्याला मार्शलच्या ड्युटीवर तैनात करण्यात आले होते. एलामारन करीम आणि अनिल देसाई यांनी मार्शल्सचा सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेत मार्शल्सकडून खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
यानंतर सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर विरोधी पक्षांचे खासदार मार्शलशी वाद घालताना दिसत आहेत. विरोधकांचे हे कृत्य लाजीरवाणे आणि महिला मार्शलसोबत असभ्य वर्तनाचा आरोप सरकारने पलटवार करत केला आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता महिला मार्शल समोर आल्या आहेत. दोन महिला खासादारांनी आपल्या फरफटत नेलं, असा आरोप महिला मार्शलने केला आहे.
सेक्युरीटी असिस्टंट अक्षिता भट आणि राकेश नेगी यांनी संसदेतील सेक्युरिटी सर्व्हिसच्या संचालकांकडे लेखी अहवाल दिला आहे. खासदारांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचं त्यांनी अहवालात म्हटलं आहे. पुरुष खासदारांना सुरक्षेचं कडं तोडता यावं म्हणून दोन महिला खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेताम यांनी आपले हात धरून फरफटत नेलं, असा आरोप महिला मार्शने केला आहे.
गदारोळ करत असलेले काही खासदार आपल्या दिशेने धावत आले आणि सुरक्षेचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. आपण विरोध केल्यावर खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेताम या दोन महिला खासदार बाजूल सरकल्या आणि पुरुष खासदारांना सुरक्षेचे कडे तोडण्यासाठी आणि टेबलपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता दिला, असं अक्षिता भट यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App