CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनामुळे निधन, गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

CPM leader Sitaram Yechury son Ashish Yechury Death due to corona at Medanta Hospital in Gurugram । CPM

Ashish Yechury Death : CPM नेते सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे की, त्यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिष यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. CPM leader Sitaram Yechury son Ashish Yechury Death due to corona at Medanta Hospital in Gurugram


विशेष प्रतिनिधी

गुरुग्राम : CPM नेते सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे की, त्यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिष यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अतिव दु:खाने हे सांगावे लागतेय की, कोरोनामुळे मी आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिष येचुरीला गमावले. ज्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि आम्हाला आशा दिली अशा सर्वांचा मी आभारी आहे. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे असलेले सर्व… ”

आशिष येचुरी मृत्युसमयी 35 वर्षांचे होते. दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरू होते. गंभीर झाल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. आशिष यांच्याव्यतिरिक्त सीताराम येचुरी यांच्या कुटुंबात एक पत्नी आणि मुलगी आहे.

CPM leader Sitaram Yechury son Ashish Yechury Death due to corona at Medanta Hospital in Gurugram

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात