Corona vaccination : कोरोना महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच एक मोठी कामगिरी करणार आहे. देश लवकरच कोरोना लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार करणार आहे. कोरोनावरील लस हीच या युद्धातील सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणूनच या विशेष प्रसंगासाठी विशेष तयारी केली जात आहे. यासाठी एक खास थीम साँग लाँच करण्यात आले आहे. लसीकरण 100 कोटींचा टप्पा पार होताच हे थीम साँग देशभरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवरून ऐकवले जाईल. Corona vaccination 100 crore dose Mansukh Mandaviya launched a special vaccine song in the voice of Kailash Kher
प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच एक मोठी कामगिरी करणार आहे. देश लवकरच कोरोना लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार करणार आहे. कोरोनावरील लस हीच या युद्धातील सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणूनच या विशेष प्रसंगासाठी विशेष तयारी केली जात आहे. यासाठी एक खास थीम साँग लाँच करण्यात आले आहे. लसीकरण 100 कोटींचा टप्पा पार होताच हे थीम साँग देशभरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवरून ऐकवले जाईल.
टीके से बचा है देश टीके से टीके से बचेगा देश टीके से….#BharatKaTikakaran pic.twitter.com/aXfB8n65J7 — Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) October 16, 2021
टीके से बचा है देश टीके से टीके से बचेगा देश टीके से….#BharatKaTikakaran pic.twitter.com/aXfB8n65J7
— Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) October 16, 2021
कैलाश खेर यांच्या आवाजात हे थीम साँग 100 कोटी डोसनंतर सर्वत्र लाँच केले जाईल. आज म्हणजेच शनिवारीदेखील एक गाणे लाँच करण्यात आले आहे. हे गाणे लसीकरणाच्या जाहिरातीसाठी आहे, जे पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत तेल आणि वायू कंपन्यांनी संयुक्तपणे बनवले आहे. कैलाश खेर यांनीही या गाण्याला आवाज दिला आहे. असे सांगितले जात आहे की, लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा आकडा सोमवारपर्यंत स्पर्श करण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले, देशातील 97 कोटींहून अधिक लोकांना पहिला डोस दिला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतातील शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि भारतात बनवलेली लस देशाच्या वापरात आली, यासाठी आम्हाला पूर्वीप्रमाणे परदेशांवर अवलंबून राहावे लागले नाही. आगामी काळात आम्ही 100 कोटी डोस देण्यास सक्षम होऊ.
ते म्हणाले, 100 कोटी डोसनंतर कैलाश खेर यांचे स्वतंत्र थीम साँग लाँच केले जाईल जे सर्व सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी ऐकवले जाईल. आजचे थीम साँग लसीकरण प्रमोशनसाठी आहे, जे पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत तेल आणि वायू कंपन्यांनी संयुक्तपणे बनवले आहे.
त्याचवेळी, कैलास खेर म्हणाले की, लसीबाबत देशात अजूनही चुकीची माहिती असल्याची परिस्थिती आहे, हे थीम साँग फक्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जारी केले जात आहे. हे गाणे केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर जागृतीसाठीही बनवले आहे.
Corona vaccination 100 crore dose Mansukh Mandaviya launched a special vaccine song in the voice of Kailash Kher
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App