वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे पण आता सोनिया गांधी यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची आणि राहुल गांधी परदेशात असल्याची बातमी आली आहे. त्यामुळे ईडीने समन्सनुसार नियोजित वेळेत हे दोन्ही नेते चौकशीला कसे सामोरे जाणार?, हा महत्वाचा प्रश्न तयार झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली आहे. Corona to Sonia Gandhi, Rahul Gandhi abroad
सोनिया गांधी यांना काल सौम्य ताप असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून सोनिया गांधी यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. सोनिया गांधी यांच्या समवेत बैठकीत उपस्थित असणारे काही नेते देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सगळे नेते लवकर बरे होतील, अशी अपेक्षा आहे. सोनिया गांधी यांना 8 जून रोजी ईडीच्या चौकशीला सामोरे जायचे आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्या याबाबतचा निर्णय घेतील, असे रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.
– राहुल गांधी परदेशात
दरम्यान राहुल गांधी 19 मे पासून परदेशात आहेत. इंग्लंडमध्ये ते विविध विद्यापीठांच्या कार्यक्रमांना हजर राहिले होते. त्यानंतर ते अद्याप भारतात परत आलेले नाहीत. त्यामुळे आज ते नियोजित वेळेनुसार ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ शकलेले नाहीत. राहुल गांधी 5 मे रोजी परत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते चौकशीला सामोरे जातील, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App