अमेरिकेत ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा, कोरोना वाढू लागल्याने पालकांत भिती


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : अमेरिकेत एकूण बाधितांपैकी एक चर्तुथांश रुग्णांत लहान मुलांचा समावेश आहे.‘अमेरिकी ॲकडेमी ऑफ पीडियाट्रिक्स ॲड द चिल्ड्रन हॉस्पिटल’च्या एका अहवालानुसार गेल्या दीड वर्षात देशातील सुमारे ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा झाली असून जुलै महिन्याचा विचार केल्यास तब्बल ७ लाख ५० हजारापेक्षा अधिक मुलांना संसर्ग झाला आहे. Corona spreading very fastly in students in USA

कोरोनाच्या सावटाखाली अमेरिकेत विद्यार्थी जुलैपासूनच शाळेत हजेरी लावत आहेत. परंतु आता लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.



मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हवेशीर जागा आणि योग्य खबरदारी असल्यास शाळेत जोखीम राहणार नाही, असे एका अभ्यासात म्हटले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोना वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. मे महिन्यात कॅलिफोर्नियाच्या मारिक कौंटीत एका शाळेत लस न घेतलेल्या एका शिक्षकामुळे २६ जणांना कोरोनाची लागण झाली. जुलै महिन्यांत दर आठवड्याला सुमारे ७२ हजार मुलांना कोरोनाची बाधा होत होती. त्यामुळे सध्या देशातील एकूण बाधितांपैकी २९ टक्के रुग्ण अल्पवयीन आहेत.

Corona spreading very fastly in students in USA

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात