भारतातील रुग्णसंख्येत घट होत असल्याने जगाने सोडला सुटकेचा निश्वास

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : जगभरातील कोरोना रुग्णांची संख्याही गेल्या काही आठवड्यांपासून घटत आहे. जागतिक रुग्णसंख्येत भारताचा वाटा मोठा असल्याने येथील रुग्णसंख्येच्या प्रमाणाचा जागतिक आकडेवारीवर परिणाम होतो. भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्याच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी जगाच्या तुलनेत ती अद्यापही प्रचंड आहे. corona patients tally decreasing in India

पॅसिफिक प्रदेशातील काही देश वगळले तर बहुतेक ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे. सर्वाधिक घट युरोपातील देशांमध्ये झाली आहे. युरोपात मृत्यू संख्याही वेगाने घटली आहे.गेल्या आठवड्यात जगभरात ४८ लाख नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ८६ हजार जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत या दोन्ही संख्यांमध्ये अनुक्रमे १२ आणि ५ टक्के घट झाली असल्यचे ‘डब्लूएचओ’ने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात भारतात २३ लाख ८७ हजार ६६३ कोरोनाबाधित आढळले. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या १३ टक्क्यांनी कमी आहे. त्याही आधीच्या आठवड्यात भारतात ५ टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली होती. जागतिक पातळीवर रुग्णसंख्या घटत असली तरी ती अद्यापही चिंताजनक पातळीवरच आहे.

corona patients tally decreasing in India