विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचे केवळ १,४२१ रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, १४९ लोकांचा मृत्यू झाला. १,८२६ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्वात मोठा दिलासा हा आहे, की आता देशात फक्त १६ हजार १८७ सक्रिय प्रकरणे उरली आहेत. सक्रिय प्रकरणांमध्ये मोठी घट म्हणजे कोरोना बाधित रुग्ण वेगाने बरे होत आहेत. Corona-infected patients are recovering rapidly
दिल्लीत १२० नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान १२२ लोक बरेही झाले असून मृत्यूची नोंद शून्य आहे. १३ जानेवारी रोजी २८,८६७ बाधितांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर दिल्लीत दैनंदिन प्रकरणांमध्ये घट झाली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील बाधितांची संख्या १०,५७,७८६ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महानगरात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मृतांची संख्या १९,५५८ झाली आहे. मुंबईत सध्या २५२ रुग्ण उपचाराखाली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App