वृत्तसंस्था
चीन : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून अनेक शहरत लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. शांघाय शहराचा त्यात समावेश आहे. Corona eruption in Shanghai, China Havoc once again; Lockdown announced
सोमवारी चीनला आपलं सर्वात मोठं शहर असणाऱ्या शांघाईमधील अनेक भागांमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. एकीकडे चीनकडून कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असताना दुसरीकडे याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरुन टीका केली जात आहे.
शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये या महिन्यात ५६ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिलिनमधील ईशान्य प्रांतांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शांघाईमध्ये त्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. शनिवारी येथे ४७ रुग्णांची नोंद झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App