विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू आहे. यापैकी 8 विमानतळ सुरू झाले असून उर्वरित विमानतळांवर काम सुरू आहे. या विमानतळांना तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. लोकांना त्यांच्या शहरातून किंवा जवळच्या शहरातून विमान प्रवासाची सुविधा मिळेल. या सर्व विमानतळांच्या निर्मितीनंतर देशातील एकूण विमानतळांची संख्या 170 च्या जवळपास पोहोचेल.Construction of 21 Greenfield Airports begins in the country
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या देशात 153 विमानतळ आहेत. त्यापैकी 114 विमानतळ देशांतर्गत आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयानं छोट्या शहरांमध्ये स्वस्त विमान प्रवास सुरू करण्यासाठी 766 मार्ग निश्चित केले आहेत. यापैकी 246 मार्गांवर विमानसेवा सुरू झाली आहे.
या योजनेच्या विस्तारासाठी विमानतळांची गरज आहे. हे लक्षात घेऊन नवीन विमानतळ बांधण्यात येत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने देशभरात 21 ग्रीनफिल्ड विमानतळांच्या स्थापनेसाठी ‘तत्त्वत: मान्यता’ दिली आहे.
गोव्यातील मोपा, नवी मुंबई, महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजापूर, हसन आणि शिमोगा, मध्य प्रदेशातील दतिया (ग्वाल्हेर), उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि नोएडा (जेवार), गुजरातमधील धोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरी कराईकल. , आंध्र प्रदेशातील दगडदर्शी, भोगापुरम आणि ओरावकल (कुन्नूर), पश्चिम बंगालमधील दुगार्पूर, सिक्कीममधील पायोग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलंगी (इटानगर). आतापर्यंत दुगार्पूर, शिर्डी, सिंधुदुर्ग, पयोग, कन्नूर, कलबुर्गी, ओरावकल आणि कुशीनगर हे आठ ग्रीनफिल्ड विमानतळ सुरू झाले आहेत.
विमानतळ प्रकल्पांच्या अंमलबजावणीची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित राज्य सरकार आणि संबंधित विमानतळ विकास कंपनीवर आहे. होलंगी (अरुणाचल प्रदेश) आणि हिरासर (गुजरात) विमानतळांचा अनुक्रमे 646 कोटी रुपये आणि 1405 कोटी रुपयांच्या अंदाजित प्रकल्प खचार्चा विकास हाती घेतला आहे.
सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने धोलेरा (गुजरात) विमानतळाचा 1305 कोटी रुपये खर्चून विकास करण्याची (फेज-क) शिफारस केली आहे. उर्वरित दहा ग्रीनफिल्ड विमानतळांच्या संदर्भात अंदाजे प्रकल्प खर्च पुढीलप्रमाणे आहे: मोपा (रु. 3000 कोटी), नवी मुंबई (रु. 16,250 कोटी), विजापूर (रु. 150 कोटी), हसन (592 कोटी), शिमोगा (रु. 220 कोटी. ), डाबरा (रु. 200 कोटी), जेवर (8,914 कोटी-फेज 1), कराईकल (रु. 50 कोटी), दगडार्थी (रु. 293 कोटी) आणि भोगपुरम (रु. 2,500 कोटी) अशी शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App