विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: सहकारी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावरून कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन खासदारांमध्ये चांगलेच वाकयुध्द झाले. मनिष तिवारी आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून एकमेंकांवर टीका केली आहे.Congress-Shiv Sena MPs’ war of words over Tarun Tejpal, Twitter war between Manish Tiwari and Priyanka Chaturvedi
याची सुरूवात कॉँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांच्या ट्विटमध्ये झाली. त्यांनी म्हटले आहे की तरुण तेजपाल हे माझे कॉलेजमध्ये असताना वरिष्ठ सहकारी होते. राजकीय आकसातून त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. आता त्यांची सन्मानपूर्वक मुक्तता झाली आहे.
यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून म्हटले की, एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणारे हे लोक आहेत. त्यांचे समर्थन करणे हे आजारी मानसिकतेचे लक्षण आहे. तेजपाल यांच्या निर्दोषत्वाल न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांची सुटका झाली म्हणून कोणी हुरळून जायचे कारण नाही. अशा शक्तीशाली गुंडाविरुध्द तक्रर करण्याची हिंमत दाखविणाऱ्या तरुणीचेही त्यांनी कौतुक केले.
यानंतर तिवारी यांनी थेट प्रियंका चतुर्वेदी यांनाच बदनामीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली. ते म्हणाले की माझ्या सहकारी खासदाराने हे थांबविले नाही तर त्यांना न्यायालयात खेचण्यात येईल.
2013 मध्ये गोव्यात आयोजित केलेल्या तेहलका मासिकाच्या एका कार्यक्रमात तरुण तेजपाल यांनी आपल्याच एका कनिष्ठ सहकारी तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी तरुणीने तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर तरुण तेजपाल यांन अटक झाली होती. नुकतीच त्यांची न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे.
चतुर्वेदींंच्या यांच्या टीकेवर उत्तर देताना तिवारी म्हणाले, आपण एक वकील असून न्यायालयाचे निकालपत्र कसे वाचावे हे चतुर्वेदी यांच्यापेक्षा चांगले माहिती आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे असेल ते मुंबई उच्च न्यायालयात सांगा.
चतुर्वेदींनी यावर पलटवार करताना म्हटले की निकालाचा हवाला देऊन तिवारी यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. त्यांनाही मत व्यक्त करण्याचा तितकाच अधिकार आहे जितका तिवारी यांना एका बलात्काºयाचे समर्थन करण्याचा आहे.
बदनामीची धमकी मिळाल्यावर अस्वस्थ झालेल्या चतुर्वेदी म्हणाल्या की त्यांनी तिवारी यांचे नाव घेतलेले नाही. मात्र, तिवारी म्हणाले केवळ इशारा करणेही पुरेसे आहे. त्यानंतर चतुर्वेदी यांनी शेवटच्या ट्विटमध्ये म्हटले की नैतिकतेच्या ºहासापेक्षा कायद्याचे अज्ञान असणेही चांगले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App