काँग्रेसची महागाई आणि लोकशाही “कोसळतातच” कशा??, कळायला काही मार्ग नाही!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे कुठलेही आंदोलन असे “कोसळतेच” कसे?? असा प्रश्न आता तयार झाला आहे. कारण काँग्रेसने कुठलेही आंदोलन हाती घेतले की त्याचे “कोसळणे” ठरल्याच्याच साक्षी मुंबईनंतर बिलासपूर मधल्या घटनेने दिल्या आहेत. Congress save Democracy Agitation stage broke in bilaspur

बिलासपूर मध्ये लोकशाही कोसळली

त्याचे झाले असे : छत्तीसगडच्या बिलासपूर मध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी सेव्ह डेमोक्रसी आंदोलन रविवारी केले. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव तिथे जमला होता. कार्यकर्त्यांची केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध आणि मध्य प्रदेश मधल्या शिवराज सिंह चौहान सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू होती. पण यादरम्यान तिथे उभारलेल्या छोट्या स्टेजवर काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एवढी गर्दी झाली, की त्या गर्दीच्या ओझ्याने ते स्टेज ऐन घोषणाबाजीतच कोसळले. त्यामुळे स्टेजवरचे नेते आणि कार्यकर्ते धडामकन खाली आले आणि काँग्रेसचे लोकशाही आंदोलन “कोसळून पडले”!!

https://youtube.com/shorts/8ZEKrhtq_-s?feature=share

मुंबईत बैलगाडी कोसळली

पण काँग्रेसी आंदोलन कोसळण्याचा हा काही पहिलाच अनुभव नाही. असाच अनुभव 10 जुलै 2021 रोजी मुंबईत आला होता. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने महागाई विरुद्ध विशेषत: भडकत्या इंधन दरवाढी विरोधात मोठे आंदोलन केले होते. यासाठी त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर बैलगाडी आणली. आता त्या बैलगाडीवर काही नेत्यांनी चढून आंदोलन करण्यापेक्षा, त्या नेत्यांपाठोपाठ कार्यकर्तेही बैलगाडीवर चढले. अर्थातच छोट्या बैलगाडीला त्यांचे ओझे सहन झाले नाही आणि “देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो”, अशी घोषणा देत असतानाच बैलगाडी नेत्यांसकट धडामकन कोसळली. बैल सैरभैर झाले. त्यामुळे काँग्रेसच्या त्या महागाई विरोधातल्या आंदोलनाचे हसे झाले. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला जबरदस्त टोला हाणून घेतला. “देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो”, ही घोषणा बैलांना आवडली नसावी, असा टोमणा फडणवीस यांनी मारून घेतला.

पण छत्तीसगड मधल्या बिलासपूरचे लोकशाही वाचवा आंदोलन असो, अथवा मुंबईतले महागाई विरोधातले आंदोलन असो काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते छोट्या स्टेटचा विचार न करता त्याच्यावर चढतात कसे??, हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचे स्टेज ओझ्यामुळे कोसळते आणि त्यांच्या गंभीर विषयावरील आंदोलनाचे हसे होते. हे त्यांना समजत नाही का?? हा खरा प्रश्न आहे!!

Congress save Democracy Agitation stage broke in bilaspur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात