काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणात, पक्षाचे ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे


काँग्रेसमधील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र ती कृती योग्य व्यासपीठावर व्हायला हवी. दुसऱ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी टीका करू नये. आता काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. Congress president Sonia Gandhis appeal to leaders, it is time to repay the party’s debt


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसमधील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र ती कृती योग्य व्यासपीठावर व्हायला हवी. दुसऱ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी टीका करू नये. आता काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

राजस्थानमधील उदयपूर येथे १३ ते १५ मे या कालावधीत काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजिण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून सर्व नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे जादूची कांडी नाही. त्यामुुळे खूप मेहनत घेऊन काँग्रेसला पुढे न्यावे लागणार आहे.


Varun Gandhi : एमएसपी गॅरंटीसाठी वरुण गांधी आणणार प्रायव्हेट मेंबर बिल, म्हणाले – कायदा करण्याची हीच ती वेळ!


काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, चिंतन शिबिर हा उपचार होऊ नये. त्यातून झालेल्या चचेर्तून दिशा मिळून काँग्रेस पुनर्संघटित झाली पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे. आपल्यासमोर असलेल्या अनेक आव्हानांवर मात करावी. काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत आहे. पक्षाचे ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे. ते लक्षात घेऊनच काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी पक्षकार्य करावे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला पक्षाचे नेते जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, काँग्रेसच्या पुढच्या वाटचालीसाठी नवीन आराखडा तयार करण्याकरिता चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच त्याआधी येणाºया विधानसभा निवडणुकांकरिता काँग्रेस पक्षाला ठामपणे मैदानात उतरले पाहिजे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून हे चिंतन शिबिर आयोजित केले आहे.

Congress president Sonia Gandhis appeal to leaders, it is time to repay the party’s debt

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात