काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय सर्जरीची गरज; जी – २३ व्यतिरिक्त वीरप्पा मोईलींच्या रूपात २४ वे नेते बोलले


वृत्तसंस्था

बेंगळुरू – काँग्रेसचे ४७ वर्षांचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडण्याचा काँग्रेस नेत्यांवर चांगलाच परिणाम झाला असून ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या दिशेने बाण सोडायला सुरूवात केली आहे. जी – २३ नेत्यांपैकी कपिल सिब्बल यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेतृत्वाला पक्षाच्या कारभारात लक्ष घालण्याची सूचना केलीच आहे. Congress long delayed major surgery and it was needed right now; there is no tomorrow, Veerappa Moily tells in interview to PTI

पण आता जी – २३ व्यतिरिक्त २४ वे नेते काँग्रेस नेतृत्वाला सुनावण्यासाठी पुढे आले आहेत, ते म्हणजे कर्नाटकातले ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली. वीरप्पा मोईलींनी काँग्रेसमध्ये मोठ्या सर्जरीची गरज असल्याचे म्हटले आहे. पक्षात सत्तेची पदे देताना काँग्रेस नेतृत्वाने संबंधित नेत्याच्या निष्ठा तपासून आणि तावून सुलाखून घेतल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले आहे.

मोईलींनी जितीन प्रसाद यांच्यावर या वेळी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की जितीन प्रसाद यांच्या काँग्रेसनिष्ठे विषयी पहिल्यापासूनच शंका होती. त्यांना उत्तर प्रदेशात जातीयवादी राजकारण करायचे होते. पक्षाने त्याला अटकाव केला म्हणूनच ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले दिसतात. या पुढे पक्षनेतृत्वाने कोणत्याही नेत्याला पदे देताना त्याची निष्ठा तपासून घेतली पाहिजे.

खरेतर काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय सर्जरीची गरज आहे. ज्यांना जनाधार नाही, लोकांशी ज्यांचा संपर्क नाही, त्यांना विविध पदांवरून दूर करून नवीन आणि तळागाळात संपर्क असणाऱ्या कार्यकर्त्यांना पदे दिली पाहिजेत आणि त्यांच्या कडून कामे करून घेतली पाहिजेत म्हणजे पक्ष संघटना मजबूत होईल, अशी सूचना मोईली यांनी काँग्रेस नेतृत्वाला केली आहे.

-वीरप्पा मोईली २४ वे नेते

वीरप्पा मोईली हे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या जी – २३ गटाचे म्हणजे असंतुष्ट गटाचे सदस्य नाहीत. ते कर्नाटकातले ज्येष्ठ नेते आहेत. राजीव गांधींच्या काळात तरूण नेते होते. १९९२ ते १९९४ या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री, पेट्रोलियम मंत्री, पर्यावरण मंत्री होते. सध्या त्यांच्याकडे काँग्रेसचे कोणतेही पद नाही.

Congress long delayed major surgery and it was needed right now; there is no tomorrow, Veerappa Moily tells in interview to PTI

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात