काँग्रेस नेत्याचे राष्ट्रपतींविषयी वादग्रस्ट ट्विट : चमचागिरी शब्द वापरला, राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस


प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. मुर्मूंसारख्या राष्ट्रपती जगातील कोणत्याही देशाला मिळू नयेत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाचा केंद्रातील सत्ताधारी भाजपने खरपूस समाचार घेतला. तसेच राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर उदित राज यांनी आपल्या विधानाचा काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.Congress leader’s controversial tweet about the President Uses the word ‘Chamchagiri’, notice from National Commission for Women

उदित राज यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. ते मुर्मू यांनी गुजरातमध्ये केलेल्या एका विधानाचा दाखला देत म्हणाले होते – ‘द्रौपदी मुर्मूंसारखा राष्ट्रपती जगातील कोणत्याही देशाला मिळू नये. चमचेगिरीचीही हद्द झाली. देशातील 70 टक्के जनता गुजरातचे मीठ खाते असे त्या म्हणतात. स्वतः मीठ खाऊन आयुष्य काढले असते तर त्यांना कळेल.’



त्यांच्या या ट्विटनंतर एकच गदारोळ सुरू झाला. राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पात्रा म्हणाले – ‘उदित राज यांनी राष्ट्रपतींसाठी वापरलेला शब्द अत्यंत चिंताजनक आहे. पण काँग्रेसने राष्ट्रपतींसाठी अशा शब्दांचा पहिल्यांदाच वापर केला नाही. यापूर्वी अधीर रंजन चौधरी यांनीही असे केले होते.’

NCW ची नोटीस, राज यांची स्पष्टोक्ती

राज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) नोटीस बजावली आहे. एनसीडब्ल्यूने त्यांना आपल्या विधानावर माफी मागण्याचे निर्देश दिलेत. दुसरीकडे, या प्रकरणी वाद वाढल्यानतर राज यांनी एका ट्विटद्वारे आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले – द्रौपदी मुर्मंविषयी एखाद्या दुबे, तिवारी, अग्रवाल, गोयल, राजपूताने सवाल उपस्थित केला असता तर त्यांचे पदाचा अनादर झाला असता. आम्ही दलित-आदिवासी टीका करणार व यासाठी लढणार. आमचे प्रतिनिधी बनून जातात आंधळे-बहिरे बनतात.

मुर्मू मीठाविषयी काय म्हणाल्या होत्या?

राष्ट्रपती मुर्मू 4 ऑक्टोबर रोजी गांधीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की, देशातील 76 टक्के मीठाचे उत्पादन गुजरातमध्ये होते. त्यामुळे गुजरातचे मीठ सर्व भारतीय खातात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावेळी त्यांनी गुजरात मॉडलचीही प्रशंसा केली. त्या म्हणाल्या – पंतप्रधान मोदी गुजरातच्या प्रगतीशील व सर्वसमावेशक संस्कृतीचे आदर्श प्रतिनिधी आहेत.

Congress leader’s controversial tweet about the President Uses the word ‘Chamchagiri’, notice from National Commission for Women

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात