राजस्थानात मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच; पण काँग्रेस अध्यक्षपद लढवय्यांची मात्र ‘मैत्री भेट’!; राजकीय अर्थ काय?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये सध्या परस्पर विसंगत राजकीय वातावरण दिसत आहे. राजस्थानात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेस सुरू आहे, पण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या लढतीत मात्र आज एक “मैत्री भेट” झाली आहे!! Congress leader Digvijaya Singh met party MP Shashi Tharoor today

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रीपद सचिन पायलट यांना मिळू द्यायचे नाही, असा चंग बांधून प्रसंगी काँग्रेस हायकमांड गांधी परिवाराशी पंगा घेतला आहे, तर दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरलेले दोन नेते दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांनी मात्र एकमेकांची “मैत्री भेट” घेतली आहे.

या भेटीचे ट्विट स्वतः शशी थरूर यांनी केले आहे. दिग्विजय सिंह यांनी आज माझी भेट घेतली. आम्ही दोघे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरत आहोत. पण आमची लढत मैत्रीपूर्ण असेल. आमच्यापैकी कोणीही जिंकले, तरी प्रत्यक्षात तो काँग्रेसचा विजय असेल, अशा आशयाचे ट्विट शशी थरूर यांनी केले आहे.

 शशी थरूर यांच्या ट्विटचा अर्थ काय??

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि शशी थरूर हे दोन्ही नेते जरी उतरणार असले तरी ते “गांधी” नसलेले पण गांधी परिवाराचे निष्ठावंत नेते आहेत. शिवाय या दोन्ही नेत्यांना गांधी परिवाराचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. या दोघांपैकी कोणीही निवडणूक जिंकले तरी, शशी थरूर यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस जिंकेल!!, याचा नेमका अर्थ काय??, याचे उत्तर या दोन्ही नेत्यांच्या त्यांच्या गांधी परिवाराच्या निष्ठेत दडले आहे.

त्याचबरोबर या ट्विटचा आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून जो संघर्ष आहे, तो थेट एक्झिक्यूटिव्ह पॉवरशी संबंधित आहे. ते थेट घटनात्मक सत्तापद आहे. काँग्रेसची सध्याची राजकीय अवस्था बघता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद खऱ्या अर्थाने एक्झिक्यूटिव्ह पॉवरशी संबंधित आहे का??, हा गंभीर प्रश्न आहे. मग अशावेळी ते पद राजस्थानच्या मुख्यमंत्री पदापेक्षा राजकीय दृष्ट्या “भारी” ठरू शकते का?? हा ही सवाल सगळ्यात महत्त्वाचा आहे.

विद्यमान राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणे म्हणजे सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्यासारखे आहे. त्या निवडणुकीचा निकाल आणि त्यामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स नेमका काय असेल??, याला राजकीय महत्त्व आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर जो कोणी नेता बसेल त्याच्यावर काँग्रेसचा परफॉर्मन्स उंचावण्याची जबाबदारी असेल. मग इच्छा असो वा नसो त्या परफॉर्मन्स बद्दल बक्षीस किंवा शिक्षा त्या नेत्याला स्वीकारावीच लागेल!!… अशा स्थितीत राजस्थानच्या मुख्यमंत्री पदापेक्षा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद राजकीय दृष्ट्या “भारी” ठरते का??… विचार ज्याचा त्याने करायचा आहे!!… शशी थरूर यांच्या “असाही” अर्थ आहे!!

Congress leader Digvijaya Singh met party MP Shashi Tharoor today

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी