राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेसला बॅकफूटभर ढकलले. त्यानंतर त्यांनी अदानी मुद्द्यावर देखील काँग्रेस पेक्षा वेगळा सूर काढला. त्यामुळे काँग्रेस हायकमांड मध्ये तीव्र नाराजी असून त्याचे पडसाद निकटच्या भविष्यात निश्चित उमटतील, अशी माहिती काँग्रेसच्या अंतर्गत वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस हायकमांडची नाराजी प्रामुख्याने सावरकर आणि अदानी मुद्द्यावर असणे स्वाभाविक आहे. कारण पवारांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलले अशा बातम्या आल्या.Congress high command very much unhappy with sharad Pawar, may target him soon over his uncomfortable issues

पण प्रत्यक्षात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बैठकीत पवारांनी सावरकरांचा विषय काढून जे काही खुलासे केले होते, त्यानंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी गप्प बसले होते. त्यांनी तो विषय फारसा वाढविला नव्हता. उलट सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यावर भर दिला होता. याचा अर्थ सावरकर हा विषय तिथेच संपला, असे राहुल आणि सोनिया गांधी या दोघांनीही गृहीत धरले होते. पवारही तसेच म्हणाले होते. पण नंतर नागपूरच्या आणि मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सावरकर विषय पुन्हा काढला. त्यातही पवारांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत सावरकर विषयावर विस्ताराने स्पष्टीकरण दिले. नेमके हेच काँग्रेस हायकमांडला खटकले आहे.



सावरकर हा विषय जर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी साठी राजकीयदृष्ट्या अडचणीचा असेल आणि काँग्रेस त्यावर गप्प बसायला तयार असेल तर पवारांनी पुन्हा पुन्हा तो विषय काढण्याचे कारण काय?? हा सवाल काँग्रेस हायकमांडने केला आहे. याबाबत आता थेट पवारांना अतिवरिष्ठ पातळीवरूनच स्पष्टपणे सुनावण्यात येईल, अशी अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी पवारांना राजकीय आणि कायदेशीर अडचणीचे ठरू शकतात असे अनेक विषय काँग्रेस हायकमांडच्या हाताशी आहेत. ते जाहीररित्या काढून पवारांच्या दुखऱ्या नसा दाबण्याचे सूचक इशारेही हायकमांडने दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

जे सावरकरांच्या मुद्द्याच्या बाबतीत तेच अदानी मुद्द्याच्या बाबतीत सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर मात्र बॅकफूटवर जायला तयार नाही. उलट पवारांनी वेगळा सूर काढल्यानंतर राहुल गांधींनी अजिबात माघार न घेता अदानी मुद्द्यावर ट्विट केलेच आहे. पण त्याचबरोबर अन्य काँग्रेस नेत्यांनी देखील आक्रमक होत अदानी विरोधातील मोहीम सुरूच ठेवली आहे. अगदी अलका लांबा यांच्यासारख्या दिल्ली प्रदेशापुरत्या मर्यादित असणाऱ्या महिला नेत्याने देखील अदानी विरोधातील मोहिमेत राहुल गांधींना साथ दिली आहे. म्हणूनच सावरकर आणि अदानी मुद्द्यावर पवारांनी वेगळे सूर लावून सावरकरांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करणे आणि त्यानंतर अदानी मुद्द्यावर काँग्रेसला अडचणीची होऊ शकेल अशी भूमिका जाहीर करणे या दोन मुद्द्यांवर काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज असून फार काळ पवारांसारख्या विरोधी नेत्याकडून होणारी कोंडी सहन करणार नाही. उलट पवारांना खऱ्या अर्थाने अडचणीचे ठरू शकणारे अनेक विषय काँग्रेस हाय कमांडच्या हाताशी आहेत ते जाहीर रित्या भविष्यात पुढे येऊ शकतात असा सूचक इशारा थेट पवारांना पोहोचविण्याच्या सूचना हायकमांडने दिल्या आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

Congress high command very much unhappy with sharad Pawar, may target him soon over his uncomfortable issues

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात