कर्नाटकात काँग्रेसला राष्ट्रीय शिक्षणाचे वावडे; डॉ. हेडगेवार यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला; भाजपची तिखट टीका

वृत्तसंस्था

बेंगलुरु : कर्नाटकात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसने मागच्या भाजप सरकारचे निर्णय फिरवण्याचा धडाका लावला आहे. मागच्या भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या हिजाब विरोधी प्रतिज्ञापत्रात लवकरच बदल करून नवे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची काँग्रेस सरकारची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला राष्ट्रीय शिक्षण देखील रुचेनासे झाले आहे. कारण कर्नाटकातल्या शिक्षण क्रमातील काही धडे वगळण्याचा मनसूबा काँग्रेसच्या मंत्र्यांनी बोलून दाखवला आहे.Congress calls for national education in Karnataka; Dr. Hedgewar’s chapter dropped from the syllabus

कर्नाटकात भाजपचे सरकार असताना राष्ट्रवादी विचारसरणीच्या विचारवंतांचे धडे वेगवेगळ्या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचाही एक धडा सध्या अभ्यासक्रमात आहे. मात्र तो वगळण्यासंदर्भातली वक्तव्ये कर्नाटकचे काँग्रेसचे शिक्षण मंत्री मधु बंगाराप्पा यांनी केले. अखेर हा धडा कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून वगळला. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे काँग्रेस सरकारला राष्ट्रवादी विचारांचे वावडे आहे त्यांना खरा इतिहास शिकवायचा नाही म्हणूनच त्यांनी आपले राष्ट्रद्रोही उद्योग सुरू केले आहे अशा शब्दात बोम्मई यांनी सरकारचे वाभाडे काढले.



हेडगेवारांचा धडा वगळायच्या वक्तव्याला दुसरे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दुजोरा दिला आहे. मधु बंगाराप्पा आणि दिनेश गुंडूराव यांचे वैशिष्ट्य असे, की हे दोघेही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री अनुक्रमे एस. बंगाराप्पा आणि आर. गुंडूराव यांचे पुत्र आहेत. हे दोन्ही काँग्रेसचे मुख्यमंत्री होते.

कर्नाटकातल्या भाजप सरकारने ब्रिटिश ब्रिटिशांच्या मेकॉले शिक्षण पद्धती फाटा देत काही बदल घडवले होते. इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमात राष्ट्रवादी विचारवंतांचा समावेश केला होता. त्यात त्यांनी नेहरू आणि टिपू सुलतान यांचे धडे वगळले होते. आता त्याचा राजकीय बदला म्हणून काँग्रेसचे सरकार डॉ. हेडगेवार यांचा धडा वगळला आहे. कर्नाटकचे माजी शिक्षण मंत्री बी. नागेश यांनी या सर्व प्रकारचा निषेध केला आहे.

Congress calls for national education in Karnataka; Dr. Hedgewar’s chapter dropped from the syllabus

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात