प्रथम तुला वंदिते!!; सिद्धिविनायकाच्या दर्शनाने ममतांची महाराष्ट्र मोहीम सुरू, पण सिद्धिविनायक ममतांच्या राजकारणाला पावणार??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आज राजधानी मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत दाखल झाल्याबरोबर त्यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर गाठत “प्रथम तुला वंदिते” असे म्हणत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि आपली महाराष्ट्र मोहीम सुरू केली.Congratulations to you first !!; Mamata’s Maharashtra campaign starts with Siddhivinayak’s darshan, but Siddhivinayak will get Mamata’s politics

ममता बॅनर्जी या आज रात्री आठ वाजता मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी आदित्य यांच्यासमवेत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील असणार आहेत.ममता बॅनर्जी यांनी आपली मुंबई भेट श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरू केल्यामुळे त्या देखील राहुल गांधी यांच्या सारख्याच सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने वळल्या का?, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. परंतु पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सहाच महिन्यांपूर्वी त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळत गावागावातल्या मंदिरांना भेटी देऊन देवदेवतांचे दर्शन घेतले होते.

आपण कायस्थ ब्राह्मण आहोत, असे त्यांनी अनेक जाहीर सभांमध्ये आवर्जून सांगितले होते. त्यामुळे आजचा त्यांचा महाराष्ट्र दौरा श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरू होत असल्यास त्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने वळल्याचे आश्चर्य वाटायला नको.

अर्थात हा दौरा त्यांचा हा त्यांचा दौरा राजकीय दृष्ट्या किती सफल होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव त्यांना भेटणार नाहीत. त्यामुळे अशा राजकीय अर्थाने देखील ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा अर्ध्यावरच सुरू झाला आहे.

पण आदित्य ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचे नंबर दोन आणि तरुण नेते भेटणार असल्याने ममतांची भेट अगदीच विफल गेले नाही, असेही म्हणावे लागेल. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत ममता बॅनर्जी तृणमूळ काँग्रेसच्या गळाला महाराष्ट्रातला कोणता काँग्रेस नेता लावतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

 आदित्य ठाकरे – ममता भेट राजकीय की नुसती सदिच्छा??

आज रात्री आठ वाजता शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील असणार आहेत. स्वतः संजय राऊत यांनी दिल्लीत ही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जी यांची भेट घेऊ शकणार नाहीत, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सकाळीच स्पष्ट केले होते. परंतु त्यावेळी शिवसेनेच्या वतीने नेमके कोण भेटणार?, हे सांगितले नव्हते दुपारी संजय राऊत यांनी याबाबत खुलासा करुन आदित्य ठाकरे हे आज रात्री आठ वाजता ममता बॅनर्जी यांची भेट घेतील. त्यांच्यासमवेत मी असेन, असे सांगितले.

उद्धव ठाकरे स्वतः भेटणार नसताना त्यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या वतीने भेट घेणार आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवसेनेतला नंबर 2 पक्का झाला आहे. शिवाय संजय राऊत हे त्यांच्या समवेत असल्याने “राजकीय पाय इकडे तिकडे” पडण्याची शक्यता नाही. आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रोटोकॉल देखील पाळला जाईल आणि शिवसेनेत राजकीय संदेश देखील पोहोचेल.

स्वतः उद्धव ठाकरे भेटणार नसल्यामुळे विरोधी ऐक्यावर फारसा ठोस निर्णय होण्याची अपेक्षा नाही. परंतु अगदीच कोणी भेटले नाही असेही दाखवता येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर सदिच्छा भेट असल्याचे सांगता येऊ शकेल. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी स्वतःहून आदित्य ठाकरे यांच्याकडे काही राजकीय प्रस्ताव दिला तर ते स्वतः निर्णय घेऊ शकणार नाहीत पण तो अर्थातच आपल्या पिताश्रींकडे ते पोहोचवू शकतील.

यातून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून विशिष्ट राजकीय वर्चस्व अबाधित राहील आणि ममता बॅनर्जी यांच्याशी ते बरोबर येणे किंबहुना एक पायरी वर राहून देखील वाटाघाटी करू शकतील, असा शिवसेनेचा राजकीय होरा असू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना पुढे करून ममता बॅनर्जी यांची भेट घ्यायला लावण्यात येत आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Congratulations to you first !!; Mamata’s Maharashtra campaign starts with Siddhivinayak’s darshan, but Siddhivinayak will get Mamata’s politics

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय