LPG Commercial Cylinder : LPG सिलेंडर १७१.५० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवीन दर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे नवीन दर ठरवतात.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कंपन्यांनी आजपासून(१मे) कर्मिशियल सिलिंडरची किंमत १७१.५० रुपयांनी कमी केली आहे. आजपासून दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १८५६.५० रुपये झाली आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात काहीच बदल झालेला नाही. Commercial LPG cylinder prices slashed by Rs 171 per unit

यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ९१.५० रुपयांनी कपात करण्यात आली होती. अशाप्रकारे पाहिले तर व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर दोन महिन्यांत २६३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे नवीन दर ठरवतात.

आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये १९६०.५० रुपये, मुंबईत १८०८.५० रुपये आणि चेन्नईमध्ये २०२१.५० रुपये झाली आहे. १ मे २०२२ रोजी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २३५५.५० रुपयांना उपलब्ध होते. आज किंमत रु.१८५६.५० पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ४९९ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Commercial LPG cylinder prices slashed by Rs 171 per unit

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात