कमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दसरा सण जवळ आला असताना कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची घट झाली असून याचा लाभ ग्राहकांना परोक्ष रूपात मिळणार आहे. परंतु, त्याचवेळी केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 % वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक गॅसची किंमत 6.1 डाॅलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. नवीन दर 1 ऑक्टोबर म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. Commercial gas cylinder cheaper by Rs.25

कमर्शियल गॅस सिलिंडरच्या घरांमध्ये 25 रुपयांची घट झाल्याने देशात सरासरी सर्व शहरांमध्ये 1850 रुपयांना 19 किलोचा गॅस सिलेंडर मिळणार आहे.

पण नैसर्गिक गॅसची किंमत 6.1 डाॅलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. एप्रिल 2022 मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत वाढून 6.10 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली होती. 1 ऑक्टोबरपासून यामध्ये वाढ करण्यात आली असून, 8.57 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. म्हणजेच यामध्ये 40 % वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ही वाढ दुप्पट करण्यात आली होती.

रशिया- युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीत 1 डाॅलरने वाढ झाल्यानंतर सीएनजीच्या दरात साडे चार रुपये प्रतिकिलो इतकी वाढ होते. सीएनजीच्या दरात 12 ते 13 रुपये किलो वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Commercial gas cylinder cheaper by Rs.25

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण