आता बाजारात येणार रंगीत बटाटा; कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवण्यास होणार मदत


  • या बटाटय़ाचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. ग्वाल्हेर येथील रंगीत बटाटा संशोधन केंद्रात विकसित केला जात आहे. Colored potatoes will now hit the market; Corona will help boost the immune system during the period

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशविदेशात अनेक भाज्या वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होतात. फ्लॉवर पांढऱ्या रंगात मिळायचा आता हिरव्या रंगाचा देखील फ्लॉवर बाजारात उपलब्ध आहे. तसेच आता बटाटय़ाची देखील भर पडणार आहे. या बटाटय़ाचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. ग्वाल्हेर येथील रंगीत बटाटा संशोधन केंद्रात विकसित केला जात आहे.

लवकरच तो सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. हा रंगीत बटाटा कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवू शकेल. चीननंतर हिंदुस्थान हा दुसऱ्या क्रमाकांचा बटाटा उत्पादक देश आहे.त्यामुळे बटाटय़ाचे नवे वाण विकसित करण्यावर संशोधकांचा भर आहे.



ग्वाल्हेरच्या केंद्रातील संशोधकांनी बरीच मेहनत घेऊन या रंगीत बटाटय़ाची प्रजाती विकसित केली आहे. या बटाट्याच्या प्रजातीमध्ये आयर्न, कॅरटिन भरपूर प्रमाणात आहे. संशोधक डॉ. शिवप्रताप सिंह यांनी सांगितले की, हा बटाटा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तसेच लहान मुले आणि महिलांमधील ऑनिमियाची समस्या दूर होईल.

Colored potatoes will now hit the market; Corona will help boost the immune system during the period

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात