राऊतांची राज्यपालांवर टोलेबाजी तरी विधानसभा अध्यक्षांची “आवाजी” निवडणूक लटकलेलीच!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नियमावलीत बदल करून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा घाट घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी अद्याप चाप लावलेला आहे. यावरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. Despite Raut’s attack on the Governor, the “Voice” election of the Assembly Speaker is still pending !!

इतका अभ्यास बरा नव्हे लाॅकडाऊनच्या काळात कमी अभ्यास झालेला दिसतो आहे. तरी अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे एवढाचा अभ्यास करावा, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांना लगावला आहे.



विधानसभा अध्यक्ष निवडी संदर्भात मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन काल महा विकासाकडे तीन मंत्री छगन भुजबळ एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांना भेटले होते. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. परंतु घटना तज्ञांशी चर्चा करून मग कळवतो, असे राज्यपालांनी त्यांना सांगितले आहे. अद्याप राज्यपालांनी आपला कोणताही निर्णय सरकारला कळवलेला नाही. त्यावरुनच संजय राऊत यांनी राज्यपाल खूप अभ्यासू आहेत. परंतु, इतका अभ्यास बरा नव्हे. घटनेत स्पष्ट लिहिले आहे की मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांनी मान्य करायची आहे. तरी देखील ते मान्य करत नसतील तर वेगळा विचार करावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांची टीकाटिपणी कितीही जोरदार असली तरी राज्यपालांनी लावलेला महाविकास आघाडी सरकारला लावलेला चाप अद्याप मागे घेतलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लटकलेलीच दिसते आहे. विधानसभेच्या आजच्या कामकाजात कार्यक्रम पत्रिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख झालेला नाही यावरूनच अध्यक्षपदाची निवडणूक आणखी लटकलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Despite Raut’s attack on the Governor, the “Voice” election of the Assembly Speaker is still pending !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात