Delhi University : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मान्यता दिली आहे. यासोबतच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नावावरही महाविद्यालय-केंद्रांची नावे ठेवली जाणार आहेत. College named after Swatantryaveer Savarkar, New centers also set up at Delhi University in the name of Vajpayee-Jaitley
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मान्यता दिली आहे. यासोबतच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नावावरही महाविद्यालय-केंद्रांची नावे ठेवली जाणार आहेत.
दिल्ली विद्यापीठाची शैक्षणिक परिषदेची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत नवीन संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या प्रमुख भाजप नेत्यांची नावे आहेत. असे मानले जाते की, दिल्ली विद्यापीठाच्या या महाविद्यालयांचे नाव सावरकरांसह इतर भाजप नेत्यांच्या नावावर ठेवल्यानंतर एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो.
परिषदेत जी नावे मंजूर करण्यात आली आहेत त्यात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री ब्रह्म प्रकाश आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची नावेही आहेत.
College named after Swatantryaveer Savarkar, New centers also set up at Delhi University in the name of Vajpayee-Jaitley
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App