अपहृत कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हासला नक्षलवाद्यांनी सोडले

 वृत्तसंस्था

विजापूर : सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आहे, अशी माहिती छत्तीसगडच्या पोलीस सूत्रांनी दिली आहे.CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas kidnapped by Naxals during Bijapur attack on April 3, has been released by them: Police sources

या जवानाचे तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी चकमकीच्या वेळी अपहरण केले होते. त्याचा फोटो रिलीज करून नक्षलवाद्यांनी सरकारशी चर्चेची तयारी केली होती पण त्यासाठी मध्यस्थ जाहीर करण्याची अट घातली होती. अर्थात ही अट मान्य झाली किंवा नाही, याची अधिकृत माहिती नाही. पण नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंग मन्हास या जवानाची सुटका केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.आम्ही गेले तीन – चार दिवस फार वाईट मनःस्थितीत काढले. हा माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया राकेश्वर सिंग याची पत्नी मीनू यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या पतीच्या सूटकेसाठी जम्मूमध्ये आंदोलनही केले होते.

नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात झालेल्या दीर्घ चकमकीत २२ जवान शहीद झाले होते. पण त्याच मोहिमेत २५ ते ३० नक्षवादीही मारले गेले होते. चार ट्रॅक्टर ट्रॉल्या भरून नक्षलवाद्यांनी मृतदेह जंगलात नेल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते.

त्याचवेळी कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास याचे अपहरण झाल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती. त्यानुसार आज नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली आहे.

CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas kidnapped by Naxals during Bijapur attack on April 3, has been released by them: Police sources

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*