वृत्तसंस्था
मानगढ़ : राजस्थानच्या मानगढ़मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी हुतात्म्यांचा सन्मान केला. त्यासाठी त्यांना तीन मुख्यमंत्र्यांची साथ लाभली आहे. मानगढ़ हे असे क्षेत्र आहे, ज्याच्या पहाडांवर 1500 आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात आपले रक्त सांडले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड्यापेक्षा मोठे हत्याकांड ब्रिटिशांनी येथे घडवून क्रुरतेचा कळस गाठला होता. Climax of British brutality; Massacre of 1500 tribals bigger than Jallianwala Bagh
पण इतिहासाने या हुतात्म्यांना आत्तापर्यंत कधीच स्वीकारले नव्हते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मानगढ़ मध्ये राष्ट्रीय हुतात्मा स्मारक झाले आहे. तेथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह उपस्थित होते.
ब्रिटिशांविरुद्ध आदिवासींचा संघर्ष
मानगड हे आदिवासी क्षेत्र राजस्थान मध्ये येते. परंतु याच्या सीमेवर राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश अशी तीन राज्ये आहेत. याच मानगढ़ पहाडांवर गोविंद गुरु यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिशांशी टक्कर दिली होती. ब्रिटिशांनी कुटील नीती वापरून या पहाडांना घेरले आणि तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करत 1500 आदिवासींना मारले होते. हा स्वातंत्र्य संग्राम 17 नोव्हेंबर 1913 रोजी झाला होता. आदिवासींनी ब्रिटिशांचे साम्राज्य झुगारण्याचा प्रयत्न केल्याने ब्रिटिशांनी आदिवासींवर सूड उगवण्यासाठी हे हत्याकांड घडविले होते. आदिवासींचे नेतृत्व करणारे गोविंद गुरु यांना ब्रिटिशांनी सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावली. पण नंतर त्यांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले. 1923 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गोविंद गुरु यांनी आदिवासी समाज सुधारणेसाठी आपले जीवन वाहून घेतले. आदिवासी समाजातल्या अनेक कुप्रथांचे उच्चाटन केले. त्यांना सनातन धर्माशी जोडून घेतले.
राजस्थान: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बांसवाड़ा में मानगढ़ धाम के दर्शन किए। (सोर्स: DD) pic.twitter.com/HxytqygwLG — ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2022
राजस्थान: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बांसवाड़ा में मानगढ़ धाम के दर्शन किए।
(सोर्स: DD) pic.twitter.com/HxytqygwLG
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2022
मात्र या आदिवासींच्या या स्वातंत्र्यसंग्रामाला आणि हौतात्म्याला इतिहासात कधी स्थान दिले गेले नाही. कारण आदिवासींचा संघर्ष हा स्थानिक संस्थानिकांशी आणि जमीनदारांशी असल्याचे ब्रिटिशांनी दाखविले होते. तोच इतिहास स्वातंत्र्यानंतर देखील काही काळ भारतीय इतिहासकारांनी समाजासमोर मांडला होता.
आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे राष्ट्रीय स्मारक
परंतु स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतर दोनच वर्षांनी 1999 मध्ये राजस्थान सरकारने मानगढ़ मध्ये आदिवासी हुतात्म्यांचे स्मारक तयार केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या स्मारकाला भव्य दिव्य रूप देऊन राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. याच राष्ट्रीय स्मारकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे.
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 100000 हून अधिक आदिवासी बांधव मानगढ़ मध्ये एकत्र आले आहेत.
राजकीय संदर्भ
या कार्यक्रमाला राजकीय संदर्भ देखील आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये मिळून आदिवासी समुदायासाठी 99 विधानसभा जागा राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे तीनही मुख्यमंत्री या आदिवासी राखीव जागांविषयी राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेत. मात्र आजचा कार्यक्रम हा थेट पंतप्रधानांचा सरकारी कार्यक्रम आहे. त्यामुळे या थेट कुठलाही राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App