वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार झाले आहेत. दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. Clashes in Kashmir; Of Jaish-e-Mohammed Six terrorists killed; Action in two places
पोलिस दल आणि सुरक्षा दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. दोन वेगवेगळ्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना ठार केले आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.
या दोन्ही चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. सहापैकी चार दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. ठार झालेल्या चारपैकी दोन पाकिस्तानी तर दोन स्थानिक दहशतवादी आहेत.त्यांच्याकडून एक एम-४ कार्बाइन आणि दोन एके-४७ रायफलही सापडल्या आहेत. दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरुचं आहे. लष्कराच्या दोन जवानांसह तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App