चिनी ड्रॅगन करतोय अफगाणिस्तानात चंचूप्रवेश, औद्योगिक मंच उभारून करणार म्हणे विकास


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमध्ये औद्योगिक मंच स्थापण्याची तयारी चीनने चालविली असून पुढील आठवड्यात याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. याद्वारे एकप्रकारे चीनने आता अफगणिस्तानात पाउल टाकण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते. China trying to enter in Afghanistan

ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी मुखपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी गुंतवणुकीच्या संधी हेरण्याचे काम या संस्थेचे असेल. चायना टाऊन इन काबूल या नावाने चीनच्या औद्योगिक प्रतिनिधींचे एक पथक यासाठी प्रयत्नशील आहे.



ते एक संस्था उभारणार असून अफगाण इन्स्टिट्यूट असे तिचे नाव असेल. पथकाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक उद्योग आणि इतर संस्थांसह संयुक्त मंच उभारण्यासाठी यापूर्वीच करार करण्यात आले आहेत.

वैयक्तिक सुरक्षा, सरकारबरोबर विविध प्रकारच्या मंजुरीसाठी समन्वय, बँकेच्या माध्यमातून चलनाची देवाणघेवाण, संस्थेसाठी कर आणि पायाभूत सुविधा अशा सेवा चायना टाऊन इन काबूल पुरविणार आहे. आतापर्यंत पायाभूत सुविधा निर्मिती, खाण उद्योग या क्षेत्रांतील चीनच्या विविध कंपन्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे.

China trying to enter in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात