गलवान हिंसक संघर्षात चीनचे सैनिक मारले गेल्याचे लिहिल्याने चीनमध्ये ब्लॉगरला ८ महिन्यांचा तुरूंगवास


वृत्तसंस्था

बीजिंग : भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान घाटीत झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे सैनिक मारले गेल्याचे लिहिल्याबद्दल चीनमध्ये एका ब्लॉगरला ८ महिन्यांच्या तुरूंगवासात पाठविण्यात आले आहे. China jails blogger for 8 months over remarks on casualties in Galwan clash

“गलवानच्या हिंसक संघर्षात चिनी कमांडर बचावला. कारण तो वरिष्ठ पातळीवरचा अधिकारी होता. चिनी अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या सांगितलेल्या आकड्यापेक्षा कितीतरी अधिक सैनिक या संघर्षात मारले गेले असावेत.”, अशा पोस्ट क्युई झिमिंग या ब्लॉगरने केल्या होत्या. याबद्दल त्याला चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या न्यायालयाने ८ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.याआधी चिनी कम्युनिस्ट राजवटीने क्युई झिमिंगला आपल्या ब्लॉगमधीक कमेंटबद्दल जाहीररित्या माफी मागायला लावली होती. त्यानुसार त्याने माफीही मागितली होती. त्यानंतर त्याच्यावर न्यायालयात खटला चालविण्यात आला. त्याने जाहीर माफी मागितल्याने त्याला ८ महिने तुरूंगवासाची सौम्य शिक्षा देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

क्युई झिमिंग हा चीनमधला पॉप्युलर ब्लॉगर आहे. तो “Labixiaoqui” या नावाने ऑनलाइन विश्वात लोकप्रिय आहे. २५ लाख लोक त्याला फॉलो करतात. त्यामुळे त्याच्या ब्लॉगची दखल घेऊन चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने त्याला शिक्षा केल्याचे मानण्यात येत आहे.

China jails blogger for 8 months over remarks on casualties in Galwan clash

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण