सीमावर्ती भागात ताकद वाढवण्यास चीनची सुरूवात, आगळीक केल्यास चीनला सडेतोड प्रत्युत्तर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – आपल्या देशासमोर चीनने मोठे सुरक्षाविषयक आव्हान निर्माण केले असून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून दहा हजारांपेक्षाही अधिक तुकड्या आणि अन्य शस्त्रे मागील वर्षीच सीमावर्ती भागामध्ये हालविली आहेत. आपल्याला आणखी बराच काळ त्याठिकाणी राहावे लागेल असे मत सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी मांडले आहे.China is big threat to India says Army Chief

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये विश्वासाचा अभाव असून संशयाचे वातावरण देखील आणखी गडद झाले आहे. यामुळे सीमावादाचे देखील निराकरण होताना दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.चीनने सीमावर्ती भागातील स्वतःची ताकद आणखी वाढवायला सुरूवात केलीअसून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी तुकड्या तैनात केल्या असल्याचे रावत यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील ताज्या राजकीय स्थित्यंतरावर देखील रावत यांनी चिंता व्यक्त केली .

या सगळ्या बदलांचा भारताच्या सुरक्षेवर देखील परिणाम होईल असे त्यांनी सांगितले. जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून पाठबळ मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

China is big threat to India says Army Chief

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण