चीनचा खोडसाळपणा, अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावे चीनने बदलली


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीनने पुन्हा एकदा खोडसाळपणा केला असून भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेश राज्यातील आणखी पंधरा ठिकाणांचे मानकीकरण केले आहे. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असल्याचा चीनचा दावा आहे.China changed the names of 15 places in Arunachal Pradesh

या माध्यमातून चीन अरुणाचल प्रदेशावरील आपला दावा आणखी मजबूत करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.सरकारी ग्लोबल टाइम्सने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने बुधवारी या पंधरा ठिकाणांची नावे चिनी अक्षरे, तिबेट आणि रोमन वर्णमालेनुसार केली आहेत.



अरुणाचल प्रदेशचे नाव चीनसाठी झंगनान आहे. भौगोलिक नावासंबंधी चीनच्या मंत्रिमंडळाने जारी केलेल्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तंतोतत रेखांश आणि अक्षांश देण्यात आलेल्या या पंधरा ठिकाणांत आठ निवासी ठिकाणे, चार पर्वत, दोन नद्या आणि एका खिंडीचा समावेश आहे.

चीनने यापूर्वीही अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांच्या नावांचे मानकीकरण केले होते. २०१७ मध्ये सहा ठिकाणांच्या नावांचे मानकीकरण केले होते. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेट असल्याचा चीनचा खोडसाळपणा सातत्याने आहे. भारताने चीनचा हा दावा फेटाळत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

भारत आणि चीनदरम्यान ३,४८८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून वाद आहे. सीमावादावरून दोन्ही देशांदरम्यान हिंसक घटना घडलेल्या आहेत. तथापि, दोन्ही देश वाटाघाटींच्या माध्यमातून सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

China changed the names of 15 places in Arunachal Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात